Home महामुंबई वीटभट्टी, नाका कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ

वीटभट्टी, नाका कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ

1

असंघटित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली.

मुंबई – राज्यात घर कामगार आणि बांधकाम कामगार मंडळांच्या पार्श्वभूमीवर आता कागद, काच-पत्रा, प्लॅस्टिक वेचक, दगडखाण, रेती, वीटभट्टी, नाका कामगार आदी असंघटित कामगारांसाठी राज्यात स्वतंत्र कामगार मंडळ स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी असंघटित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिली.

असंघटित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे प्रमुख डॉ. गजानन देसाई, त्यांच्याशी संलग्न असलेल्या सात संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी आणि बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख अ‍ॅड. नरेश राठोड उपस्थित होते.

खासगी वाहनचालक आणि क्लीनरसाठी स्वतंत्र कामगार मंडळ स्थापन करण्याचा कामगार संघटनांचा प्रस्तावही मुश्रीफ यांनी तत्काळ मान्य केला. हॉटेलमधील वेटर तसेच अन्य कामगारांसाठी मार्च महिन्यात बैठक घेऊन त्यासंदर्भातील प्रस्तावाच्या मान्यतेबाबत विचार केला जाईल. तसेच फूलकाम, कॅटरसमध्ये काम करणा-या महिलांचा घर कामगार मंडळात समावेश तर बांधकाम क्षेत्रातील टर्नर, फिटर आणि प्लंबिंग आदी तांत्रिक कामगारांना कामगार मंडळाच्या सवलती देण्यात येतील, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. नाका कामगारांना बिल्डर्स आणि बांधकाम मालकांपासून कोणत्याही सवलती मिळत नाहीत. यामुळे ते सर्व सरकारी सवलतींपासून वंचित राहतात. यामुळे त्यांची जिल्हास्तरावर नोंद करून त्यांच्यासाठी नाक्यांवर शेड बांधून देण्यात यावी, अशी मागणी डॉ. देसाई यांनी केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version