Home मनोरंजन वैभव-प्रार्थनाचे ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’

वैभव-प्रार्थनाचे ‘व्हॉट्सअ‍ॅप लग्न’

1

‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे ही हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘व्हॉट्सअप लग्न’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा वैभव-प्रार्थनाची केमिस्ट्री अनुभवता येईल. नटसम्राटचे निर्माते विश्वास जोशी आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते नानू जयसिंघानी यांनी प्रथमच एकत्र येत व्हॉट्सअप लग्न या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी असलेल्या या चित्रपटाचं कर्णमधूर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं हा देखील यामागचा हेतू आहे.

प्रदर्शनाची तारीख अगोदर घोषित केल्याने ऐनवेळी होणारा तारखांचा घोळ टाळता येईलच. पण त्यासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही मुबलक वेळ मिळेल हा एक महत्त्वपूर्ण विचारही व्हॉट्सअप लग्नच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे नटसम्राट या चित्रपटाचे निर्माते विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. फिनक्राफ्ट मीडिया आणि व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version