Home टॉप स्टोरी शनिवार, रविवार शाळेला सुट्टी

शनिवार, रविवार शाळेला सुट्टी

1
संग्रहित छायाचित्र

तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणासाठी राज्यभरातील शाळांत आठवडयाचे पाचच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई – तणावमुक्त आणि आनंददायी शिक्षणासाठी राज्यभरातील शाळांत आठवडयाचे पाचच दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी ‘शिक्षण हक्क’ कायद्यातील तरतुदींचा आधार घेण्यात आला असून राज्यभरातील शाळांना आता शनिवार, रविवारची सुट्टी मिळणार आहे.

राज्यातील शिक्षण विषयक कायदे आणि शिक्षण हक्क अधिकार कायद्यात आठवडयाचे पाच दिवस शाळा सुरू ठेवावी, अशी तरतूदच नसल्याने याविषयी येत्या काळात मोठा गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पाच दिवसांत शाळांनी नियमांनुसार आखून दिलेल्या तासिका पूर्ण केल्या पाहिजेत, असा निर्वाळा शिक्षण अवर बी. आर. माळी यांनी दिला आहे.

पाच दिवस शाळा सुरू ठेवण्यात कोणत्याही अडचणी नसल्याने त्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे लेखी आदेश त्यांनी राज्यातील शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या तासांबद्दल घेतलेला निर्णय जुनाच असून यात काहीही नवीन नसल्याचा दावा केला आहे. शिक्षण विभागाने २९ एप्रिल २०११ रोजी हा निर्णय घेतल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम १९७७ आणि १९८१ च्या नियमावलीनुसार पाच दिवसांच्या आठवडयाची सवलत पूर्वीपासूनच देण्यात आली आहे. मात्र शाळेचा कामकाज वाढवून अनेक शाळा पाच दिवसांचा आठवडा करतात. शिक्षणाधिकारी त्याला मान्यताही देतात, अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे मुंबई प्रमुख अनिल बोरनारे यांनी दिली

शाळांना सुट्टयाच सुट्टया

वर्षातील ३६५ दिवसांत शाळांना विविध १४५ दिवस सुट्टया मिळत असतात. यात दिवाळी, उन्हाळी सुट्टया ४२, दिवाळीतील १८ व काही शाळा ख्रिसमस आणि गणपती उत्सवासाठी १० अशा सुट्टया घेतात. तर जयंती, राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून १८ आणि वर्षात येणारे रविवार किमान ५२ रविवार अशा या सुट्टया असल्याने वर्षभरात अध्र्याच्या वष्रे शाळा चालते. यात आता पाच दिवसांची शाळा करण्यात आल्याने मुलांच्या तणाव मुक्तीपेक्षा शैक्षणिक तास व तणावाचाच भार विद्यार्थ्यांना उचलावा लागण्याची शक्यता विविध शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कॉन्व्हेट शाळांना सवलत

माध्यमिक शाळा संहितेतील नियम क्रमांक ५४.२ मधील परिशिष्ट २५ मध्ये अॅग्लो इंडियन स्कूलला पाच दिवसांची शाळा सुरू ठेवण्याची तरतूद आहे. मात्र हे करत असताना शाळांना आठवडयात कधीही शाळा बंद ठेवून ते पाच दिवस पूर्ण करण्याचीही सवलत आहे. मात्र शिक्षण हक्क अधिकार कायद्यात अशा प्रकारे पाच दिवसांची शाळा करण्याची तरतूदच नाही. यामुळे विद्यमान शालेय शिक्षणमंत्री राज्यातील शाळा पाच दिवसांची करून केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात शाळांचे नुकसान करत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

1 COMMENT

  1. आठवड्यातील ६ दिवस सुरू ठेवण्यात येणार्‍या शाळा आता फक्त 5डे विक करण्यात येणार यामूळे पालक व पाल्य यांच्या मनात एक उत्साही वातावरण राहणार आहे. परंतु कित्येक खासगी कंपन्या अशा आहेत, ज्या ३६५ दिवस चालू ठेवण्यात येतात,त्यांचे कामाचे तासही वाढवण्यात येतात. आजही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी अस्तित्वात असूनही कित्येक कंपन्या ३६५ दिवस चालू ठेवाव्या लागतात किंवा त्यांचे कामकाजाचे तास वाढीव करण्यात येतात. पूर्वीही कार्यालयीन कामकाज व्हायचे ते ही मनुष्यबळाच्या सहाय्याने, त्यांच्या अक्कलहुशारीने .२१ व्या शतकात आज संगणकही अशी वस्तू बाजारात आली आहे. जी किमान १० व्यक्तिंची कामे त्यांच्या वापरात येणार्‍या वेळेपेक्षा लवकर करून देते. तरीही कंपनीत कामकाजाचे तास कमी न होता वाढविले जातात. यात नेमकी चुकी कोठे सापडली जाते? कार्यालयात अत्यंत मूर्ख माणसे तेथील आस्थापना विभाग निवडून देते, की तेथील कर्मचार्याना सर्व येत असूनही ते आळस करतात किंवा कामे करणार्‍या व्यक्तीकडुनच काम उरकून घ्यायची व इतर कर्मचार्यांनि फक्त गप्पागोष्टी करण्यात महिने घालवून पगार घ्यायचे अशा कंपन्याचा कधी शोध तपास नियंत्रकाने शोध घेतला आहे का? यात ते कोणती मदत करतील? भरपूर प्रमाणात कर्मचारी ठेवून अत्याधुनिक टेक्नोलॉजी असूनही कामाचे तास कमी न होता वाढत जातात. याचे कारण कोणते? बाहेरील राज्यातून येणाऱ्या व्यक्ती मोठ्या पदावर निवडले जातात आणि स्थानिक उमेदवारांस त्रास देण्यास उगीच तासन तास थांबवून ठेवतात. ना त्याचे कुटुंब मुंबईत राहत ना त्यांना इथे कोणी विचारात म्हणून स्थानिक उमेदवारास त्रास देण्याचे काम आणखी किती वर्ष खाजगी कंपन्या करीत राहणार. १२ ते १४ तास त्रास देऊन कामकाज करून घेणे याला का अत्याधुनिक टेक्नोलॉजी चा चांगला वापर झाला असे घोषित करता येते का? जरी मुलांना शनिवार, रविवार सुट्टी शाळा ने दिली तरी पालकांना त्यांच्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही याचे कारण वरील दिलेल्या स्पष्टीकरणातून स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version