Home टॉप स्टोरी शिक्षकदिनी विद्यार्थ्यांना मोदींचे भाषण ऐकण्याची सक्ती

शिक्षकदिनी विद्यार्थ्यांना मोदींचे भाषण ऐकण्याची सक्ती

1

‘मोदी सरकार’ने आता मार्केटिंगचा नवा फंडा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनानिमित्त होणारे भाषण ऐकण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे.
मुंबई- ‘मोदी सरकार’ने आता मार्केटिंगचा नवा फंडा सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनानिमित्त होणारे भाषण ऐकण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. त्याबाबतचा फतवाच केंद्रीय मनुष्यबळ खात्याने काढला आहे. ज्या शाळांमध्ये टीव्ही संच उपलब्ध नाही, तेथे तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. शिवाय, प्रोजेक्टरच्या माध्यमातून भाषण दाखवण्याची व्यवस्था करावी, असेही फर्मान शाळांना काढण्यात आले आहे.

दुर्गम भागात टीव्हीची सोय नसल्यास रेडिओद्वारे भाषण ऐकवा, असेही सांगण्यात आले. ही सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापकांना जुंपण्यात आले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ही जबरदस्ती असून, हिटलरशाहीचेच हे प्रतिक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

शिक्षकदिनी दुपारी तीन ते पाऊणे चार या वेळेत मोदी भाषण करणार आहेत. हे भाषण शाळेतच प्रत्येक विद्यार्थ्यांने ऐकावे, अशी जबरदस्ती केंद्र सरकारने शाळांवर केली आहे. इतकेच नव्हे तर किती विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले? याचा अहवालही मुख्याध्यापकांना द्यावा लागणार आहे. लोकशाहीत हुकमशाही गाजवण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान व्हावा, अशी अपेक्षा असते.

मात्र, पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याच्या व्यवस्थेत शिक्षकांना जुंपून शिक्षकदिनीच त्यांचा अवमान करण्याचे धोरण मोदी सरकारने अवलंबले आहे. हे योग्य नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. जनता नक्कीच याबाबत विचार करेल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

मोदींचे भाषण ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करणे, हे योग्य नसल्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. शिवाय, भाषण ऐकण्याची व्यवस्था शिक्षक करू शकतात का? याचीही चाचपणी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता थेट फतवा काढणे चुकीचे असल्याचेही चव्हाण म्हणाले. दरम्यान, मोदी सरकारच्या या फतव्यामुळे शिक्षकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

1 COMMENT

  1. ह्याच जर म्याडम नि सांगितला असता तर तर तो आदर्श (अशोक )चवान नि ह्यो रानो हेन्च्यानी रातोरात शाळा बांदून पोरांका हाडून तेंचो शेंबूड फुसान तेंका भाषण ऐकवला असता.मेलो चवान बोलता.जेचा भाषण असा तेनी तुझ्या सारखे साशियेक मेवनेक आणि भावाबंदक फुकटची घर वाटूक नाय. मेलेल्यांच्या टाळूवरचा लोणी खानारे तुमी.निर्लज्ज शरमसांडे त्वांड वर करून बोलतत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version