Home महामुंबई शिवरायांना मानाचा मुजरा देण्यासाठी नेटक-यांची मोहीम

शिवरायांना मानाचा मुजरा देण्यासाठी नेटक-यांची मोहीम

1

दिनविशेष, संशोधक, कलाकार, देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान केलेल्या व्यक्तींची माहिती एका क्लिकवर देशभरात पोहोचवण्याचा कलात्मक मार्ग म्हणजे ‘गुगल’चे ‘डुडल’.

मुंबई – दिनविशेष, संशोधक, कलाकार, देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान केलेल्या व्यक्तींची माहिती एका क्लिकवर देशभरात पोहोचवण्याचा कलात्मक मार्ग म्हणजे ‘गुगल’चे ‘डुडल’. इंटरनेटच्या विश्वात आघाडीवर असणा-या ‘गुगल’ या सर्च इंजिनद्वारे अ‍ॅनिमेशनसह कलात्कम पद्धतीचा वापर करत ‘गुगल’ या शब्दांऐवजी एक कलाकृती बनवली जाते ज्याला ‘डुडल’ म्हणतात.

अगदी दोन दिवसांवर आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ने होमपेजवर शिवरायांचे ‘डुडल’ बनवावे आणि त्यांची महती जगभर पोहोचवावी यासाठी इंटरनेटच्या विश्वात एक मोहीम सुरू आहे. अमित वानखाडे या शिवप्रेमीने आणि नेटक-यांनी एकत्र येऊन ही मोहीम सुरू केली असून त्याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

विज्ञान, गणित, समाजकारण, साहित्य, कला आदी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती सर्वत्र पोहोचावी यासाठी ‘गुगल’द्वारे डुडल बनवले जाते. ‘गुगल’च्या होमपेजवर गेल्यावर ‘गुगल’ या नेहमीच्या अक्षरांऐवजी संबंधित दिनाबाबत किंवा व्यक्तीशी निगडित त्याची महती सांगणारे एखादे चित्र किंवा अ‍ॅनिमेशन बनवले जाते. त्याच्यावर क्लिक केल्यावर सगळी माहिती मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी रोजी असणा-या जयंती दिनी ‘गुगल’ने ‘डुडल’ बनवावे यासाठी शिवप्रेमी एकत्र येऊन मोहीम राबवत आहेत. इंटरनेटच्या विश्वातील मावळ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांनी, शिवप्रेमींनी proposals@google.comया गुगलच्या अधिकृत ई-मेलवर जाऊन शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच http://change.org/shivajidoodle या संकेतस्थळावर जाऊन डुडलसाठी समर्थन देऊ शकतात.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी २५ हजार समर्थकांनी याचिकेत सहभागी होणे गरजेचे आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत २४ हजारहून अधिक जणांनी समर्थन दर्शवले असून २५ हजारांचा टप्पा पार होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे टिवटर, फेसबुकवर मोहीम सुरू आहे. किल्ले, शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण किंवा त्यांची छायाचित्र मिळून हे डुडल बनवले जाऊ शकते, असे शिवप्रेमींनी सुचवले आहे. ‘गुगल’द्वारे ‘डुडल’ बनवल्यास नव्या मावळ्यांचा शिवरायांना आगळा वेगळा मानाचा मुजरा ठरले, असे मत नेटक-यांद्वारे व्यक्त केले जात आहे.

1 COMMENT

  1. प्रौड प्रताप पुरंदर सिंहासनाधिश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज कि जय……….. सा-या जगाला भारी.. १९ फेब्रुवारी ………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version