Home टॉप स्टोरी शिवसेना बालबुद्धीची, सिंहाचा अर्थ कळला नाही

शिवसेना बालबुद्धीची, सिंहाचा अर्थ कळला नाही

1

शिवसेना-भाजपात वाघ व सिंहातील झुंज चांगलीच रंगली आहे. ‘मुंबईतील वाघ संपले. आता गल्ली गल्लीत सिंह दिसेल’, या गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या वक्तव्याचे समर्थन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले आहे. 

मुंबई- शिवसेना-भाजपात वाघ व सिंहातील झुंज चांगलीच रंगली आहे. ‘मुंबईतील वाघ संपले. आता गल्ली गल्लीत सिंह दिसेल’, या गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या वक्तव्याचे समर्थन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले आहे. प्रकाश मेहता बोलले, पण त्याचा अर्थ त्यांना कळला नाही. ते बालबुद्धीने टीका करतात, असा टोला हाणत शेलार शिवसेनेच्या बालबुद्धीवर घसरले.

मुंबईतील वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल. सिंहाचे राज्य आता सुरू झाले आहे, असे विधान मेहता यांनी कर्नाक बंदर चौकातील ‘मेक इन इंडिया’चे प्रतीक असलेल्या सिंहाच्या अनावरण प्रसंगी केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेहता यांनी शिवसेनेला डिचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोर पोस्टर लावून मेहता यांची तुलना ‘माजलेला बोका’ अशी करण्यात आली. मुंबईचे खरे वाघ शिवसेनाच असल्याचे या पोस्टरद्वारे सांगण्याचा प्रयत्न झाला. या पोस्टरबाजीबरोबरच शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सिंहाच्या नरडीचा घोट घेणा-या वाघाचा फोटो प्रसिद्ध करत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला.

मात्र, मेहता यांनी केलेल्या विधानाचे समर्थन भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले. प्रकाश मेहता जे बोलले ते बोलले. मुंबईसह राज्यात गल्ली गल्लीपर्यंत सिंह पोहोचला आहे आणि पोहोचतोय. याचा अर्थ हा सिंह ‘मेक इन इंडिया’चे प्रतीक आहे. सामान्य माणसांपर्यंत मेक इन इंडिया पोहोचून रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा, अशीच सरकारची भूमिका आहे. या अर्थाने प्रकाश मेहता बोलले.

पण, याचा अर्थ ज्यांना कळला नाही ते बालबुद्धीने टीका करत आहेत, असे शेलार यांनी सांगितले. मुंबई म्हणजे प्राण्यांची सर्कस नव्हे, असे सांगत शेलार यांनी मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा असावा, अशीच भाजपाची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून मेक इन इंडिया सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले.

1 COMMENT

  1. साहेब सिंहाची भाषा तुम्ही संगीतलीत पन या साठी वाघ संपवाची भाषा करने म्हनजे हे काही जुलेनासे होते तेपन तुम्हीच समजवले तर बरे होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version