Home टॉप स्टोरी शीव रुग्णालयातील ४५ डॉक्टरांना विषबाधा

शीव रुग्णालयातील ४५ डॉक्टरांना विषबाधा

1

स्वातंत्र्यादिनानिमित्त बनवण्यात आलेल्या तिरंग्याच्या बर्फिने शीवमधील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांचा घात केला.
मुंबई-  स्वातंत्र्यादिनानिमित्त बनवण्यात आलेल्या तिरंग्याच्या बर्फिने शीवमधील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांचा घात केला. सकाळी पोषक आहार म्हणून देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये कंत्राटदाराने तिरंग्याची बर्फी दिली. ती खाल्ल्याने रुग्णालयातील ४५ डॉक्टरांना विषबाधा झाली. या डॉक्टरांवर तातडीने उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

महापालिकेच्या रुग्णालयांतील डॉक्टरांचा क्षयरोगाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने प्रमुख रुग्णालयांमध्ये डॉक्टरांसाठी पोषक आहाराच्या नावाखाली नाश्ता देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कंत्राटदाराने तिरंगी बर्फी मिठाई म्हणून वाटली. ती खाल्ल्यानंतर डॉक्टरांना दोन तासांत पोटदुखी आणि मळमळण्याचा त्रास होत उलटया झाल्या. आधी दोघांना झाला. मात्र नंतर अनेकांना त्रास झाल्याने त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.

४५ डॉक्टरांना बर्फीमुळे विषबाधा झाल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश सुपे यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

मावा खराब असण्याची शक्यता

डॉक्टरांना देण्यात आलेली मिठाई आकर्षक दिसण्याकरता त्यावर केशरी, सफेद आणि हिरवा रंग देण्यात आला होता. त्यामुळे मावाच खराब असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या दुकानातून ही मिठाई खरेदी करण्यात आली होती, त्या दुकानदारावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली असली, तरी याबाबत तक्रार दाखल करून घेतली नसल्याचेही बोलले जात आहे.

1 COMMENT

  1. लाखो रुपये कमावणारे डॉक्टर्स सुद्धा दोन रुपयांची “बर्फी “फुकट मिळाल्यावर आवडीने खातात ,,!! मोठ्ठा विनोद !!!! हा ! हा!हा !!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version