Home क्रीडा राहीचा ‘सुवर्णवेध’

राहीचा ‘सुवर्णवेध’

1

भारतीय नेमबाज राही सरनोबत हिने कोरिया येथे झालेल्या २५ मीटर शुटींग विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताच्या राही सरनौबतने इतिहास रचला आहे. २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुर्वणपदक पटकावणारी राही पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे.

चांगओन येथे झालेल्या स्पर्धेत तिने कोरियाच्या किऑनगे किमचा ८-६ च्या फरकाने पराभव केला. या विश्वविजेत्या कामगिरीने राहीचा अंजली भागवत, गगन नारंग, संजीव राजपूत, राजवर्धनसिंह राठोड, रॉनजॅन सोढी आणि मानवजितसिंग संधू या भारताच्या अव्वल नेमबाजाच्या पंक्तीत समावेश झाला आहे. या सर्व नेमबाजांनी आएसएसएफ विश्चचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.

या विजयानंतर राहीने स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली. या स्पर्धेसाठी गेल्या काही महिन्यांपासून मी गन फॉर ग्लोरी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षक अँनाटोली यांच्यासह खडतर सराव करत होते, असे तिने सांगितले. २०११ मध्ये अमेरिकेत झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत राहीने कास्यपदक पटकावले होते.

1 COMMENT

  1. Bravo ! Great…Salute to RAHI !
    महाराष्ट्र सरकारने या वाघिणीचा यथोचित सत्कार करून तिला हवी ती मदत करावी या खेळात तिला, अजून बराच पल्ला गाठायचा आहे तिला ! माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ! ग्रेट ! ग्रेट ! ग्रेट !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version