Home Uncategorized शेअरमधील गुंतवणुकीवर आज ‘ईपीएफओ’ची बैठक

शेअरमधील गुंतवणुकीवर आज ‘ईपीएफओ’ची बैठक

1

शेअर बाजारात गुंतवणूक आणि गृहवित्त संस्थांना वित्तपुरवठा यावर शुक्रवारी होणा-या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीमध्ये विचारविमर्ष केला जाणार आहे.
नवी दिल्ली – शेअर बाजारात गुंतवणूक आणि गृहवित्त संस्थांना वित्तपुरवठा यावर शुक्रवारी होणा-या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीमध्ये विचारविमर्ष केला जाणार आहे. ६ लाख कोटी रुपयांचा निधीचा यामध्ये वापरण्यासाठी नियमावली शिथिल करण्याबाबत ही चर्चा होईल.

केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या या बैठकीत शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी सध्याच्या आव्हानांवर या चर्चेचा रोख असेल, असे कार्यक्रम पत्रिकेतून स्पष्ट होत आहे. नुकतेच ईपीएफओच्या एका गटाने शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी सकारात्मक मत नोंदवले होते. नफ्यात असलेल्या ब्लूचिप सार्वजनिक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची या गटाची भूमिका आहे. दरम्यान, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सचिव आणि सीबीटी सदस्य डी. एल. सचदेव यांनी या गुंतवणुकीला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून गृहवित्त संस्थांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दबाव आला तरी त्या दबावा झुकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाने १५ टक्के निधी कर्जस्वरूपात हा परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध करण्याची शिफारस केली आहे. यामुळे ७०,००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊन ३.५ लाख अतिरिक्त स्वस्त घरांची निर्मिती होऊ शकेल, असे म्हणणे पंतप्रधान कार्यालयाने मांडले आहे.

1 COMMENT

  1. विनाशकाले विपरीत बुद्धी -पंतप्रधान कार्यलय सटकले आहे.मला जर संधी मिळाली तर हे सिद्ध पण करून दाखवीन पंतप्रधान कार्यालयाला.नका करू हे धाडस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version