Home Uncategorized शेळीपालन : उन्नतीचा साधासरळ राजमार्ग!

शेळीपालन : उन्नतीचा साधासरळ राजमार्ग!

1

शास्त्रोक्त शेळीपालन हे आधुनिक काळातील महत्त्वाचे रोजगाराचे साधन ठरलेले आहे व त्यासाठी सरकारी योजनांचा महत्त्वाचा हातभार लागलेला आहे. 

शास्त्रोक्त शेळीपालन हे आधुनिक काळातील महत्त्वाचे रोजगाराचे साधन ठरलेले आहे व त्यासाठी सरकारी योजनांचा महत्त्वाचा हातभार लागलेला आहे. शेळी पालनाविषयीच्या महत्त्वाच्या सूचना तसेच सरकारी योजना, बँककडील कर्ज योजना याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती शेळीपालन करणा-यांना महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा आहे.

जंगलामध्ये सोडून किंवा झुडपातील पानांमधून शेळी आपल्या अन्नाची गरज भागवते. शेतीमधून वाया जाणारा पालापाचोळा चारून बकरीपालन करता येते. चरण्यासाठी सोडलेली शेळी शक्यतो पडलेले गवत खात नाही. ती पुढच्या पायावर उभी राहून झुडपांचे वरचे शेंडे खाणे पसंत करते. जगात एकूण १०८ प्रकारच्या शेळींच्या जाती उपलब्ध आहेत. त्यामधील २० जाती भारतात अस्तित्वात आहेत.

शेळीपासून होणारे फायदे : लहान वयात दूध मिळते, चारा कमी लागतो, शेळीचा उपयोग दूध, मांस कातडी, केस यासाठी होतो. शेळीच्या शिंगापासून व खुरापासून उत्तम प्रकारचा डिंकयुक्त पदार्थ बनवता येतो, हिमालयातील ‘गुड्डी’ जातीची शेळी मालवाहक म्हणूनसुद्धा वापरली जाते. ज्या ठिकाणी खेचरे जाऊ शकत नाहीत. त्यासारख्या खडतर जागी ही शेळी १० किलोग्रॅमपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते, ‘चेम’ या जातीपासून शाली तयार करता येतात.

‘अंगोर’ या जातीपासून ‘मोहेर’ हे लांबलचक व चमकदार केस मिळतात, शेळी लहान असल्या कारणाने संगोपनास कमी जागा लागते, शेळी ही कळपात राहते व मादीला एकापेक्षा जास्त पिल्ले होत असल्याने कळपाची झपाटय़ाने वाढ होते म्हणूनच शेळीला ‘गरीबांची गाय’ असे संबोधण्यात येते, तृणधान्य व कडधान्यापासून मिळणारी प्रथिने यामध्ये लायसीन, ट्रॅप्टोफीन, मिथिओनिया या आम्लाची कमतरता असते. परंतु ही उपयुक्त आम्ले बक-यांच्या/शेळीच्या मटणांत असतात, एका शेळीपासून वर्षाला १२० ते १३० किग्रॅपर्यंत विष्ठा मिळते.

उत्कृष्ट खत असून ते जमिनीचा पोत व सुपीकता वाढवते. गुरांच्या शेणापेक्षा शेळीची विष्ठा हे उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे, शेळीच्या कातडय़ाला व त्यापासून बनवलेल्या वस्तूंना परदेशात व भारतात चांगली मागणी आहे. शेळीच्या व्यवस्थापनाचे सूत्र सोपे असल्यामुळे घरातील स्त्रिया व मुलेसुद्धा शेळीपालन करू शकतात व त्यांची काळजी घेऊ शकतात, शेळीचे दूध हे पचनास हलके व पौष्टिक आहे, बायोटेक्नॉलॉजी तंत्राचा उपयोग करून नवीन संशोधनानुसार शेळीच्या Anti-CRP, Anti-IG, F. Dignostic Age WZX हे बनवता येतात.

वेगवेगळय़ा जातीच्या शेळय़ा तीन प्रकार उत्पन्नासाठी वापरल्या जातात. यापैकी आपल्याकडे मांस उत्पन्नासाठीच्या शेळय़ांची मागणी जास्त आहे. आपल्याकडील वातावरणात ‘उस्मानाबादी’ ही मांस उत्पादक शेळी पैदाशीसाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते. या जातीची वैशिष्टय़े म्हणजे मादी एक वेतात सरासरी दोन करडे देते. दोन वर्षात तीन वेते देते.

या जातीच्या मटणांत मांस खाणा-यांसाठी लागणा-या कमी कॅलरीज असतात. या जातीत नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे. आपल्याकडील वातावरण जातीच्या पैदाशीसाठी योग्य आहे व त्यामुळे मरतुकीचे प्रमाण आपोआपच कमी होते.

विक्रीस योग्य नराचे वजन ३० ते ३५ किलो असते व मिळणा-या मटणाचे प्रमाण हे जिवंत वजनाच्या ४५ ते ५० टक्के असते. अशा सर्व कारणांमुळे उस्मानाबादी शेळीपासून शेतक-यांच्या फायदा मोठा आहे, असा माझा अनुभव आहे. संपर्क : ९३२३६९९८८७

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version