Home देश संकटमोचक हनुमान यांना मिळाले आधार कार्ड

संकटमोचक हनुमान यांना मिळाले आधार कार्ड

0

देशातील अनेक नागरिक आपल्या आधार कार्डच्या प्रतिक्षेत आहेत, या सर्वांना हे कार्ड कधी मिळेल ते सांगता येणार नाही. मात्र अनेकांवरील संकट दुर करणा-या भगवान हनुमान यांना हे कार्ड मिळाले आहे.
सीकर(राजस्थान)-  देशातील नागरिकांना ओळख निर्माण करुन देण्यासाठी आधार कार्ड योजना सुरु करण्यात आली. अद्याप मोठ्या संख्येने नागरिकांना हे कार्ड कधी मिळेल ते सांगता येणार नाही. मात्र अनेकांवरील संकट दुर करणा-या भगवान हनुमान यांना हे कार्ड मिळाले आहे.

देशातील अनेक सरकारी योजने प्रमाणे आधार कार्ड योजनेतील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. अनेकांवरील संकट दुर करणा-या भगवान हनुमान यांना आधार कार्ड मिळाले असून २०९४७०५१९५४११  हा त्यांचा आधार कार्ड नंबर आहे. इतक नव्हे तर या कार्डवर त्यांचा फोटोही आहे. आणि ते ‘पवन’ यांचे पुत्र असल्याची नोंद या कार्डवर आहे. फक्त हे कार्ड घेण्यास अद्याप ते आलेले नाहीत. त्यामुळे राजस्थानमधील दांतारामगड टपाल कार्यालयातील कर्मचारी गोंधळात पडले आहेत.

राजस्थानमधील दांतारामगड येथील टपाल कार्यालयात बंगळूरुवरून हे आधार कार्ड पाठवण्यात आले आहे. सहा सप्टेंबर रोजी पाठवण्यात आलेल्या या कार्डवर पत्ताच देण्यात आलेला नाही. या कार्डच्या पाकीटावर एक मोबाइल नंबर देण्यात आला आहे. मात्र तो मोबाइल नंबर बंद असल्याचे टपाल कार्यालयातील अधिका-यांनी सांगितले.

पोस्टमॅन हीरा लाल यांच्या हाती जेव्हा हे कार्ड आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही बाब त्यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास आणली. दरम्यान या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश पोस्टमास्टरांनी दिले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version