Home टॉप स्टोरी संघाने सरकार वेठीला धरले

संघाने सरकार वेठीला धरले

1

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धोरणे महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारने अमलात आणावीत म्हणून आता सरकारच्या कारभारात संघाचा थेट हस्तक्षेप होणार आहे.

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धोरणे महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारने अमलात आणावीत म्हणून आता सरकारच्या कारभारात संघाचा थेट हस्तक्षेप होणार आहे. फडणवीस मंत्रिमंडळाला सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे  बौद्धिक आता ऐकावे लागणार आहे. संघाच्या धोरणानुसार बौद्धिक ऐकणा-याला त्यानुसार काम करावे लागते.

आता संघाचे मुख्यालय असलेल्या रेशिमबागेतूनच मंत्रिमंडळाच्या धोरणासंबंधीचा रिमोट भागवतांच्या हातात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या या बौद्धिक बैठकीचे आयोजन २ डिसेंबर रोजी रेशिमबागेत करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी रेशिमबागेत जाऊन अभिवादन केले होते. आता संपूर्ण मंत्रिमंडळाची रेशिमबागेत हजेरी लागणार आहे. महाराष्ट्रातल्या सरकारला सरकारबाह्य संस्था धोरणात्मक बौद्धिक देण्याची ही या राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. संघाचा अजेंडा भागवत आणि भय्याजी मंत्रिमंडळासमोर मांडणार आणि त्यानुसार कारभार कसा करता येईल, याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दस-याच्या निमित्ताने दरवर्षी होणा-या शस्त्रपूजनाचा कार्यक्रमही केंद्रीय नभोवाणी मंत्रालयाने थेट प्रक्षेपित केला होता. त्याचप्रमाणे दस-याच्या दिवशी सरसंघचालकांचे संघसंचलनानंतर झालेले भाषणही दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. आता प्रत्यक्ष मंत्रिमंडळासमोर बौद्धिक सादर करून सरकारात थेट हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली जाणार आहे.

1 COMMENT

  1. निषेध! निषेध! तीव्र निषेध! मंत्रिमंडळ हे फक्त माननीय राज्यपाल महोदय आणि विधान सभा तसेच विधान परिषद यांनाच बांधील असले पाहिजे. म्हणजेच पर्यायाने जनतेच्या प्रती बांधील असले पाहिजे. फडणीस सरकारने हे काय भलतेच आरंभिले आहे? याचा निषेध करायलाच पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version