Home महामुंबई संत रविदास जयंतीदिनी सरकारी सुट्टी जाहीर

संत रविदास जयंतीदिनी सरकारी सुट्टी जाहीर

1

चर्मकार समाजाचे गुरू संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी केंद्र व राज्य सरकारने सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.

रोहा – चर्मकार समाजाचे गुरू संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी केंद्र व राज्य सरकारने सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाचे चर्मकार समाजातून स्वागत होत आहे. संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सरकारी सुट्टी जाहीर करण्यासाठी देश व राज्यस्तरावरील चर्मकार समाजाचे नेतृत्व करणारे विविध नेते व सस्थांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे प्रयत्न पाठपुरावा करण्यात आला होता.

तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, खासदार आनंदराव अडसूळ आणि उत्तरप्रदेश व पंजाबमधील काही खासदारांनी हा विषय संसदेत मांडून तो लावून धरला होता. या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले असून येत्या वर्षात २५ फेब्रुवारी २०१३पासून संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे संत रविदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरविंद सावळेकर यांनी सांगितले.

या निर्णयाचे स्वागत विश्वसंत रविदासीय धर्म, मुंबई ज्ञाती पंचायत महाराष्ट्र चर्मकार संघ, संत रविदास समता परिषद, संत रविदास प्रतिष्ठान, भारत मुक्ती मोर्चा, रायगड जिल्हा चर्मकार संघटना यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद सावळेकर, आर. आर. कल्याणकर, सुरेश नांदगावकर, दीपक आंबडकर, नंदू तळकर, अ‍ॅड. गजानन कारावकर, केशव साळवी, विलास पालकर, भारत गोरेगावकर आदींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

1 COMMENT

Leave a Reply to vikas Dipak Kadam Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version