Home महामुंबई सकारात्मक पत्रकारिता करावी

सकारात्मक पत्रकारिता करावी

1

‘प्रहार’शी माझा संबंध हा फार जुना आहे. माझे अनेक मित्र या वृत्तपत्रात काम करतात. माझे ७५ वर्षाचे तरुण मित्र मधुकर भावे हे प्रहारचे संपादक आहेत.

मुंबई- ‘प्रहार’शी माझा संबंध हा फार जुना आहे. माझे अनेक मित्र या वृत्तपत्रात काम करतात. माझे ७५ वर्षाचे तरुण मित्र मधुकर भावे हे प्रहारचे संपादक आहेत. राणे साहेबांची ‘प्रहार’ सुरूकरण्यामागील भूमिका आपण सगळयांनी ऐकली. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरूकेले होते. त्यात समाजाचं प्रतिबिंब त्यात उमटत होतं. आताचा काळ बदलला आहे.

राणे साहेब म्हणतात त्या प्रमाणे वर्तमानपत्रांनी ‘पेड’ न्यूज छापण्याचे काम करूनये. त्यांनी समाजातल्या सर्व गोष्टींची माहिती वाचकांना देऊन त्यांचे प्रबोधन करावे. समाजात दोन ज्ञानी माणसे एकत्र आल्यास त्यांच्यात संवाद होतो. एक ज्ञानी व एक अज्ञानी माणूस एकत्र आल्यास त्यांच्यात विसंवाद होतो तर दोन अडाणी माणसे एकत्र आली की मारामारी करतात. असो.

मला असं वाटतं की वृत्तपत्रांनी सकारात्मक पत्रकारिता करावी. मला असं नेहमी वाटतं की प्रसारमाध्यमांनी चित्रपटातील हिरोंपेक्षा वास्तवातील हिरोंना प्रसिद्धी द्यावी. समाजातल्या नकारात्मक बातम्यांना टाळावं. कारण या बातम्यांमुळे समाजात नकारात्मकता निर्माण होते.

माझी तर अशी सूचना आहे की वर्तमानपत्रांनी आपल्या दहा पानांची विभागणी करावी. त्यात किमान पाच पानं ही सकारात्मक बातम्यांसाठी द्यावी. सरसकट नकारात्मक बातम्या येत राहिल्या की समाजात नकारात्मकता पसरते. समाजात जी चांगले काम करणारी माणसे आहेत. त्यांच्या पाठीशी वृत्तपत्रांनी उभे राहावे. त्यांना प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

‘प्रहार’ला त्यांच्या या सातव्या वाढदिवसानिमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या शब्दांना जी सत्याची धार आहे ती अधिक धारदार व्हावी. ती मंडळी अष्टावधानी व्हावीत, अशा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे मला इथे बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ‘नाम’ फाऊंडेशनला मदतीचा धनादेश मिळाला आहे त्याबद्दलही मी आभारी आहे.

आपल्या आत्ममग्न अवस्थेतून बाहेर येऊन समाजासाठी काही करण्यासाठी आम्ही हे कार्य सुरु केले. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले आहे. त्या समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून आम्ही हे कार्य सुरू केले आहे. आमचे काम माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ आहे, एवढचं मी सांगतो. त्याचा तपशील आपल्याला वेळोवेळी देत राहूच, असेही अनासपुरे म्हणाले.

‘प्रहार’च्या या व्यासपीठावर असलेले श्री. नारायण राणे, संचालक निलेश राणे व नितेश राणे या सर्वाना मी या कार्यक्रमाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रसंगी ‘प्रहार’ भूषण पुरस्कार विजेत्यांचे अनासपुरे यांनी अभिनंदन केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version