Home देश सर्वच क्षेत्रांत मंदीची लाट

सर्वच क्षेत्रांत मंदीची लाट

1

अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग ते भांडवली वस्तू, बँकिंग ते आयटी आणि स्टार्ट-अप ते ऊर्जा, अशा सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे.

नवी दिल्ली- अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग ते भांडवली वस्तू, बँकिंग ते आयटी आणि स्टार्ट-अप ते ऊर्जा, अशा सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठय़ा प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कापड उद्योगात गेल्या तीन वित्त वर्षात ६७ कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे १७६०० कामगार बेरोजगार झाले. याशिवाय भांडवली वस्तू बनविणारी मोठी कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने ३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत १४ हजार कर्मचा-यांना काढून टाकले.

एचडीएफसी बँकेची कर्मचारी संख्या ६,०९६ ने कमी झाली आहे. इतर बँकांनीही मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. ऊर्जा क्षेत्रात विंड गीअर पुरवठादार कंपनी सुझलॉन एनर्जी आणि टर्बाइन मेकर रेगेन पॉवरटेक यांनी सहा महिन्यांत १,५०० कर्मचा-यांची कपात केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, खासगी गुंतवणूक, खासगी उपभोग आणि निर्यात यांचे प्रमाण घटल्यामुळे अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. वस्त्रोद्योगातील निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका छोटय़ा व्यवसायांना बसला आहे. एल अँड टीचे मुख्य वित्त अधिकारी आर. शंकर रमन यांनी सांगितले की, कंपनीने आकार कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोकर कपात करावी लागली आहे. २०१६ मध्ये २१२ स्टार्टअप कंपन्या बंद पडल्या. आदल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ५० अधिक. एका अधिका-याने सांगितले की, बंद पडलेले बहुतांश उद्योग पॉवरलूम क्षेत्रातील आहेत. विकेंद्रित क्षेत्रातील आकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा आकडा आणखी मोठा असू शकतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version