Home ताज्या घडामोडी सर्व हिंदू दहशतवादी संघाशी संबंधित – दिग्विजय सिंह

सर्व हिंदू दहशतवादी संघाशी संबंधित – दिग्विजय सिंह

1

मुंबई – आतापर्यंत पकडण्यात आलेले सर्व हिंदू धर्मीय दहशतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, असे खळबजनक विधान करत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वाद निर्माण केला आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसेही संघाशीच संबंधित होता. ही विचारधारा समाजात कटुता पसरवते. यातूनच हिंसेचा जन्म होतो आणि हिंसा लोकांना दहशतवादाकडे घेऊन जाते, असे दिग्वजय सिंह म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सिंहांच्या या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

भगवा दहशतवाद असे म्हणण्याचे पाप काँग्रेसने कायमच केले आहे, आता आम्हाला दहशतवादाशी जोडून दंगली भडकवण्याचा तर काँग्रेसचा प्रयत्न नाही ना, असा सवाल संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोव-यात असतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवादाबाबत आधी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले की, मी कधीही हिंदू दहशतवादावर भाष्य केलेलं नाही, तर मी संघी दहशतवादाबाबत बोललो आहे. भाजपने नेहमीच धर्माच्या नावावर राजकारण करून विष पसरवण्याचं काम केलं आहे.

1 COMMENT

  1. काँग्रेसने धर्माच्या नावावर भारताची फाळणी केली ! yes /NO
    काँग्रेसने धर्माच्या नावावर घटना निर्माण केली ! yes /NO
    काँग्रेसने धर्माच्या नावावर आरक्षणे निर्माण केली ! yes /NO
    काँग्रेसने धर्माच्या आधारावर पंजाबी लोकांची कत्तल केली ! yes /NO
    काँग्रेसने धर्माच्या नावावर कर्नाटक मध्ये लिगायत धर्माचा घाट घातला ! yes /NO

    जर सर्व हिंदू दहशतवादी संघाशी संबंधित आणि
    प .पू. हेडगेवार हे काँग्रेसशी संबंधित
    तर सर्व हिंदू दहशतवादी काँग्रेसशी संबंधित

    FORMULA –
    सर्व हिंदू दहशतवादी = संघाशी संबंधित
    प .पू. हेडगेवार हे = काँग्रेसशी संबंधित

    HENCE proved that
    सर्व हिंदू दहशतवादी = काँग्रेसची संबंधित .

    अरे काहीतरी लॉजिकल बोला……..!!!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version