Home देश रेल्वे परिसरात लघुशंका करणा-या १०९ जणांना तुरुंगवास

रेल्वे परिसरात लघुशंका करणा-या १०९ जणांना तुरुंगवास

1

रेल्वे स्थानक परिसर कितीही स्वच्छ केला तरी, पानाच्या पिचका-यांनी रंगलेल्या भिंती आणि लघुशंकेचा उग्र वास यामुळे डोके भणभणून जाते.

आग्रा – रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांना नेहमी रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छतेचा अनुभव येतो. रेल्वे स्थानक परिसर कितीही स्वच्छ केला तरी, पानाच्या पिचका-यांनी रंगलेल्या भिंती आणि लघुशंकेचा उग्र वास यामुळे डोके भणभणून जाते.

आग्रा विभागाच्या रेल्वे पोलिसांनी अशाच वाट्टेल तिथे लघुशंका करुन रेल्वे परिसर अस्वच्छ करणा-या प्रवाशांना जरब बसावी यासाठी विशेष अभियान चालवले आणि १०९ जणांना २४ तासांसाठी तुरुंगात पाठवले.

रेल्वेची मालमत्ता असलेल्या प्लॅटफॉर्म, रेल्वे रुळ आणि वाहनतळाच्या जागेत लघुशंका करणा-यांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांना नंतर १०० ते ५०० रुपयापर्यंतचा दंड आकारुन सोडून देण्यात आले.

जीआरपीचे अधीक्षक गोपेशनाथ खन्ना यांच्या आदेशाने रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. आग्रा विभागातंर्गत येणा-या बारा रेल्वे स्थानक परिसरात दोन दिवस ही कारवाई करण्यात आली.

फक्त लघुशंका करणा-यांवरच नव्हे तर मद्यपान करुन प्रवास करणारे तसेच ट्रेनच्या खिडकीतून सार्वजनिक ठिकाणी थुकंणा-यांवरही कारवाई करण्यात आली. ही मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग होती.

आता पुरे झाले. मागच्या सहा दशकात आपल्या सामाजिक वर्तनात बदल झालेला नाही. दरवर्षी लाखो पर्यटक या शहराला भेट देतात. त्यामुळे आता बेजबाबदार राहून चालणार नाही हाच उद्देश या अभियानामागे असल्याचे रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version