Home देश साहेबाची भाषा संसदेत नको

साहेबाची भाषा संसदेत नको

1

भारताची अधिकृत राष्ट्रभाषा हिंदी असली तरीही संसदेत इंग्रजी बोलण्याचे प्रमाण अधिक आहे. या साहेबाच्या भाषेला संसदेत बंदी घालावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली.

इटवाह(उत्तरप्रदेश)– भारताची अधिकृत राष्ट्रभाषा हिंदी असली तरीही संसदेत इंग्रजी बोलण्याचे प्रमाण अधिक आहे. या साहेबाच्या भाषेला संसदेत बंदी घालावी,  अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली.  इटवाह हिंदी सेवा ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

स्वत:ची राष्ट्रभाषा वापरणारे देश अधिक प्रगत आहेत. त्यामुळे देशात हिंदीला अधिक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. देशातील नेत्यांची हिंदीविषयक मानसिकता दुटप्पीपणाची आहे. ते जनतेकडून हिंदीमध्ये मते मागतात, पण संसदेत इंग्रजीतून भाषणे देतात. हा प्रकार थांबायला वा. आपण इंग्रजी भाषेच्या विरोधात नाही, अशी पुस्तीही यादव यांनी जोडली. देशाच्या विविध प्रांतात राहणा-या व्यक्तींनी प्रादेशिक भाषेबरोबरच हिंदीलाही प्रोत्साहन द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

1 COMMENT

  1. Mulayam yadav thinks India means only Bihar,Mp,Up and Rj.Yadav Bhau Nobody knows hindi in south or east India.As per the Indian constitution,we dont have national language.If you want to remove English,firat declare all 8th schedule languages as official.Remember we are Indians and not ”HINDIANS”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version