Home एक्सक्लूसीव्ह सुंदर दिसणं ठरतंय धोकादायक?

सुंदर दिसणं ठरतंय धोकादायक?

2

सुंदर दिसणे किती धोक्याचे ठरू शकते याचा प्रत्यय सध्या राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणा-या काही महिलांना येत आहे.
मुंबई – सुंदर दिसणे किती धोक्याचे ठरू शकते याचा प्रत्यय सध्या राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणा-या काही महिलांना येत आहे. वाहतूक विभागातील एका अतिवरिष्ठ अधिका-याकडून महिला अधिका-यांना हेरून त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार एसटी महामंडळात घडला आहे. या अधिका-याची अरेरावी दिवसेंदिवस वाढल्याने शेवटी तीन महिलांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. संबधित अधिका-याविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी या पीडित महिला अधिका-यांनी केली आहे.

गेल्या काही वर्षापासून एसटीच्या वाहतूक विभागात हा प्रकार होत आहे. ज्या महिला वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या अमिषांना बळी पडत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये, या भीतीने त्या अनेक वर्षे गप्प बसल्या होत्या. या काळात त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास देण्याचे उद्योग सुरू होते. मेमो देणे, कामात व्यत्यय आणणे, चुकीचे शेरे मारणे, एकटीलाच दालनात बोलावले जात होते. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बसून हा वाहतूक अधिकारी महिला कर्मचा-यांना आपली ओळख मोठी आहे. तुम्ही माझे काही करू शकत नाही, अशा पद्धतीनेही धमकावत असल्याचे पीडित महिला अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे हा अधिकारी दोन महिन्याने निवृत्त होणार आहे. दरम्यान, धमकावण्याचे आणि त्रास देण्याचे प्रकार वाढतच गेल्यामुळे शेवटी लेखी तक्रारीचा मार्ग या महिलांनी अवलंबला आहे.

हा धक्कादायक प्रकार असून या विरुद्ध एसटी महामंडळ संबधित अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करते की, हे प्रकरण दाबून काही घडलेच नाही, असा आव आणते हे पाहावे लागणार आहे. मात्र काही झाले तरी शेवटपर्यंत लढण्याचा आणि त्या अधिका-याला अद्दल घडवण्याचा निर्धार पीडित महिलांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केला.

[EPSB]

एसटीतील लैंगिक शोषणाची चौकशी »

एसटीतील लैंगिक शोषणाची विभागीय चौकशी करणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

[/EPSB]

>वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिका-याचे चाळे
>महिला अधिका-यांकडे लैंगिक सुखाची मागणी
>व्यवस्थापकीय संचालकांकडे तीन महिलांच्या लेखी तक्रारी
>न ऐकणा-या महिलांना कारवाईची दिली जाते धमकी

[poll id=”278″]

तक्रारींना केराची टोपली!
पीडित महिलांनी लैंगिक शोषणाबाबत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे यापूर्वी तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता लेखी तक्रार द्यावी लागत असल्याचे पीडित महिलांनी सांगितले. काही महिलांनी तर आपले विभाग बदलण्याची मागणीही केल्याचे समजते. मात्र वरिष्ठांकडून त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.

2 COMMENTS

  1. असल्या तिरबोकी हरामांना एसटीच्या मागे बांधून एसटीबरोबर पळत नेण्याची शिक्षा सुनवावी अथवा एसटीच्या मागे असलेल्या शिडीवर हातपाय बांधून महाराष्ट्र दर्शन घडवून आणावे जेणेकरून पुन्हा अशा चुकांच्या नादी जाणार नाही. हलकट कुठले की…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version