Home टॉप स्टोरी सुझानला हृतिककडून हवी ४०० कोटीची पोटगी ?

सुझानला हृतिककडून हवी ४०० कोटीची पोटगी ?

1

सुझानने हृतिककडे पोटगीपोटी चारशे कोटी रुपये मागितल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. हृतिक पोटगीपोटी ३८० कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. 

बॉलिवुडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खानने वर्षभरापूर्वी परस्परांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत चाहत्यांचा एक धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

आता दुसरी धक्कादायक बातमी म्हणजे सुझानने हृतिककडे पोटगीपोटी चारशे कोटी रुपये मागितल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. हृतिक पोटगीपोटी ३८० कोटी रुपये देण्यास तयार असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

डिसेंबर २०१३ मध्ये हृतिकने एक निवेदन प्रसिध्द करुन आपण आणि सुझान विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. हृतिकचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्का होता. कारण बॉलिवुडमधले आदर्श जोडपे म्हणून ह्तिक आणि सुझानच्या जोडीकडे पाहिले जात होते.

सुझानने तेरावर्षाच्या वैवाहित नात्यामधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मी तिच्यावर प्रेम केले आणि तिच्यावरच प्रेम करत राहीन. माझ्याशिवाय तिच्या चेह-यावर हास्य फुलणार असेल तर त्याचा मी त्याचा स्वीकार करतो असा संदेश हृतिकने त्यांच्या फेसबुक पेजवर लिहीला होता.

सुझाननेही एक निवेदन प्रसिध्द करुन यात तिने, आम्हाला दोघांनाही एकमेकांचा आदर आणि काळजी आहे. आम्ही दोन सुंदर मुलांचे माता-पिता असून, त्यांची काळजी घेणे त्यांना आनंदी ठेवणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे असे म्हटले होते.

अलीकडेच हृतिक आणि सुझान मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळयामध्ये एकत्र आले होते. चित्रपटात येण्याआधीपासून हृतिक आणि सुझान एकमेकांवर प्रेम करत होते. ‘कहो ना प्यार है’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर एका वर्षात हृतिक आणि सुझान यांनी डिसेंबर २०००मध्ये विवाह केला होता. त्यांना रिहान(सात वर्षे) आणि रिदान(पाच वर्षे) अशी दोन मुले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version