Home देश ‘सोनिया गांधींनी आदेश दिल्यास झाडू मारणार’

‘सोनिया गांधींनी आदेश दिल्यास झाडू मारणार’

1

सोनिया गांधी यांनी आदेश दिला तर मी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण राज्य झाडून काढेन असे छत्तीसगडचे केंद्रीय मंत्री डॉ.चंद्रहास महंत यांनी म्हटले आहे.

रायपूर – सोनिया गांधी यांनी आदेश दिला तर मी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण राज्य झाडून काढेन असे छत्तीसगडचे केंद्रीय मंत्री डॉ.चंद्रहास महंत यांनी म्हटले आहे.

महंत यांच्याजवळ नुकतीच छत्तीसगड काँग्रेसच्या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. केंद्रीय मंत्रीपद असताना,पक्षाध्यक्षांनी दिलेली ही नवी जबाबदारी तुम्ही यशस्वीपणे पेलू शकता का असा प्रश्न महंत यांना विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना महंत यांनी पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. त्यानंतर क्षणाचाही अवधी न लावता त्यांनी जर सोनिया गांधींनी झाडू हातात घ्यायला सांगितले तर मी तो आनंदाने घेईन आणि छत्तीसगड झाडून काढेन असं उत्तर दिले.

छत्तीसगडच्या कोब्रा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि आता छत्तीसगड काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धूरा सांभाळणारे ते एकमेव मंत्री आहेत.

दरम्यान, नंदकुमार पटेल यांच्या जागेवर महंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या २५ मे ला बातरसमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या हल्ल्यात नंदकुमार पटेल यांची हत्या करण्यात आली.

1 COMMENT

  1. आम्ही मतदारही मोदींनी आदेश दिल्यावर झाडू मारुन काँग्रेसला नाहीसे करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version