Home Uncategorized सोने तारण कर्जावर नवी बंधने

सोने तारण कर्जावर नवी बंधने

1

सोन्याच्या आयातीत गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली. ज्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली आहे. सोने आयातीला वेसण घालण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सोने तारण कर्ज देणा-या कंपन्यांवर सुवर्ण कर्जाबाबत बंधने घातली आहेत.

मुंबई – सोन्याच्या आयातीत गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली. ज्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली आहे. सोने आयातीला वेसण घालण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सोने तारण कर्ज देणा-या कंपन्यांवर सुवर्ण कर्जाबाबत बंधने घातली आहेत. यापुढे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या नाण्यांवर बँकांना किंवा वित्तीय संस्थांना कर्ज देता येणार नाही. तसेच सोने खरेदीसाठी कर्ज देऊ नये, असा आदेश आरबीआयने बँकांना दिला आहे.

बँका आणि खासगी वित्तीय संस्थांना सोन्याची नाणी, ईटीएफ आणि दागिन्यांवर आरबीआयच्या नव्या नियमानुसार कर्ज वितरण करावे लागणार आहे. आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातील गोल्ड युनिट्सवर कर्ज देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातील सोन्यावर बँकांनी कर्ज देऊ नये, असे आरबीआयने म्हटले आहे.

बँकांना ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याच्या नाण्यांवर कर्ज देण्यावरही आरबीआयने बंदी घातली आहे. तर संबधित बँकेच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतरच ५० ग्रॅमपर्यंतच्या नाण्यांवर कर्ज देता येणार आहे. एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीत १३८ टक्क्यांची वाढ झाली होती. ज्यामुळे आयात बिलामध्ये वाढ झाली आणि परिणामी चालू खात्यातील तूट वाढली होती. सोन्याची आयात कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहे.

सोने खरेदीसाठीही कर्ज नाही
आरबीआयने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी (एनबीएफसी) विशेष अधिसूचना जारी केली आहे. सोन्याची खरेदी, बिस्किटे, नाणी, ईटीएफ आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी कंपन्यांनी कर्ज देऊ नये, असा आदेश आरबीआयने या संस्थांना दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version