Home विदेश सौदीमध्ये पाकिस्तान, बांगलादेशमधील महिलेशी विवाह करण्यास बंदी

सौदीमध्ये पाकिस्तान, बांगलादेशमधील महिलेशी विवाह करण्यास बंदी

1

सौदी अरेबियातील पुरुषांना मात्र आता जोडीदार निवडताना अधिक विचार करावा लागणार आहे. कारण येथील पुरुषांना चार देशातील महिलांशी विवाह करण्याच बंदी घातली आहे.

रियाध- सौदी अरेबियातील पुरुषांना मात्र आता जोडीदार निवडताना अधिक विचार करावा लागणार आहे. कारण सौदी अरेबियातील पुरुषांना चार देशातील महिलांशी विवाह करण्याच बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या देशांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.

अन्य देशांतून नोकरीसाठी अरब देशांमध्ये येण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारे येणा-यांना रोखण्यासाठीच हे बंधन घालण्यात आल्याचे एका पोलिस अधिका-यांने म्हटले आहे. सध्या सौदीमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, चाड आणि म्यानमार या देशांतील महिलांचे प्रमाण पाच लाख इतके आहे. यापुढे सौदीमधील पुरुषांना परदेशी महिलेशी लग्न करायचे असल्यास त्यासाठी विशेष मंजूरी घ्यावी लागेल असे डॉनऑनलाइन या स्थानीक वृत्तपत्राने म्हटले आहे.

जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियामध्ये तब्बल नऊ कोटी कामगार हे अन्य देशातून आलेले आहेत. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के इतकी झाली आहे.

अन्य देशातून नोकरीसाठी आलेल्या महिला सैदीमधील पुरुषाशी विवाह करतात आणि सौदीचे नागरिकत्व मिळवतात. असे प्रकार रोखण्यासाठी ही बंदी घातली जात आहे. अर्थात यासंदर्भात सौदी सरकारने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही.

1 COMMENT

  1. सौदी अरेबियामध्ये तब्बल नऊ कोटी कामगार हे अन्य देशातून आलेले आहेत. This fig need to correct.
    other news paper mentioned 90 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version