Home देश स्विस बँकेतील भारतीय पैसा दहा टक्क्यांनी घटला

स्विस बँकेतील भारतीय पैसा दहा टक्क्यांनी घटला

0

मागच्यावर्षी स्विस बँकेतील भारतीय ठेवींमध्ये दहा टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

झ्युरीच – स्विस बँकेतून काळापैसा परत आणण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारवर दबाव येत असताना, मागच्यावर्षी स्विस बँकेतील भारतीय ठेवींमध्ये दहा टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

२०१४ मध्ये भारतीय खातेदारांची स्विस बँकेमध्ये १.८ अब्ज स्विस फ्रान्स म्हणजेच १२,६१५ कोटी रुपये इतकी रक्कम होती. २०१३ च्या तुलनेत यामध्ये दहा टक्के घट झाली.

महत्वाचे म्हणजे २०१४ मध्ये जगभरातून स्विस बँकेतील ठेवीमध्ये वाढ झालेली असताना भारतातून मात्र ठेवींमध्ये घट झाली. २०१४ मध्ये भारत वगळता स्विस बँकेच्या जगभरातल्या खातेदारांचे १०३ लाख कोटी रुपये बँकेत जमा होते. २०१३ मध्ये हाच आकडा ९० लाख कोटींचा होता. २०१२ मध्ये भारतीय खातेदारांचे ८५३० कोटी स्विस बँकेत जमा होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version