Home विदेश ‘हवे आहे’ मंगळावर जाणारे दाम्पत्य

‘हवे आहे’ मंगळावर जाणारे दाम्पत्य

1

पहिला हनिमून पृथ्वीवर आणि दुसरा मंगळावर.. अशक्य कोटीतली ही गोष्ट वास्तवात उतरवण्याचा निश्चय अमेरिकेतील कोटयधीश डेनिस टिटोने केला आहे.
पहिला हनिमून पृथ्वीवर आणि दुसरा मंगळावर.. विनोद म्हणून उडवून लावू नका. अशक्य कोटीतली ही गोष्ट वास्तवात उतरवण्याचा निश्चय अमेरिकेतील कोटयधीश डेनिस टिटोने केला आहे. २०१८मध्ये ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात सहभागी होणा-या जोडप्याला ५०१ दिवसांचा अंतराळ प्रवास करता येईल. ज्या यानातून हा प्रवास होईल ते यान प्रत्यक्ष मंगळावर उतरणार नसले तरीही त्याच्या पृष्ठभागाजवळून प्रवास करण्याचा थरार अनुभवता येणार आहे.

एवढया कमी कालावधीत मंगळावर जाऊन परत येण्याची ही दुर्मीळ संधी आहे, असा दावा टिटोने केला आहे. सामान्यपणे या प्रवासासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी आवश्यक असतो. या प्रवासासाठी एक स्पेस कॅप्सुल आणि एका रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यात दोन व्यक्तींना सामावून घेण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील. एवढा प्रचंड कालावधी अंतराळात घालवायचा म्हणजे एकाकी वाटणे आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागणे स्वाभाविकच आहे. 

हीच समस्या दूर करण्यासाठी जोडप्याला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे टिटो सांगतो. हा प्रवास एवढा लांबलचक आहे की, मंगळावर पोहोचल्यानंतर पृथ्वी केवळ एका निळया ठिपक्यासारखी दिसते. ते दृश्य पाहिल्यानंतर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी सोबत कोणीतरी असणे आवश्यक असते. आपला जीवनसाथी सोबत असेल तर ही उणीवही दूर होईल, असे मत टिटोचे म्हणणे आहे.

मोहीम पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, याची मला कल्पना आहे. मात्र आम्ही त्यावर मात करू, असा आत्मविश्वास टिटोने व्यक्त केला. दिवास्वप्ने दाखवणा-या अनेक मोहिमा आयोजित केल्या जातात. मात्र, त्या प्रत्यक्षात येणे जवळपास अशक्यच असते. माझी मोहीम तशी नाही, असे तो आत्मविश्वासाने सांगतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version