Home महाराष्ट्र कोकण ‘हापूस’ केवळ ओळख नको, ताकद बनू दे : नितेश राणे

‘हापूस’ केवळ ओळख नको, ताकद बनू दे : नितेश राणे

1

‘हापूस’ ही या भागाची ओळख आहे. मात्र ती केवळ ओळख न राहता आपली ताकद बनू दे. हापूस या नावाचा दबदबा निर्माण केल्याशिवाय बागायतदारांना न्याय मिळणार नाही, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.

देवगड- ‘हापूस’ ही या भागाची ओळख आहे. मात्र ती केवळ ओळख न राहता आपली ताकद बनू दे. हापूस या नावाचा दबदबा निर्माण केल्याशिवाय बागायतदारांना न्याय मिळणार नाही, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. पडेल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे कॅ निंग सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृ षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजन परब, प्रकाश राणे, संतोष राणे, मनिश दळवी, तालुका अध्यक्ष डॉ. अमोल तेली, जनार्दन तेली उपस्थित होते.

फीत कापुन व श्रीफळ वाढवुन आमदार नितेश राणे यांनी कॅ निंग सेंटरचा शुभारंभ केला. त्यांचे स्वागत सभापती राजन परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, देवगड हापूस च्या नावावर कर्नाटक हापूस विकला जातो यावर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्न औषध खात्याने यासाठी भरारी पथके नेमावित व विक्रे त्यांवर कारवाई करावी. असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आंबा बागायतीच्या संशोधन विषयाकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आंबा बागायतदारांची थेट विक्री व्यवस्थापनाबाबत माहीती दिली. कोका-कोला कंपनीही हापुस खरेदी थेट करण्यासाठी उत्सूक असून थेट खरेदीचा फायदा बागायतदारांना होणार आहे. कारण यामुळे किलो मागे शेतक-यांना एक रुपया अधिकचा दर मिळणार मिळणार आहे.

माझाला मिळणार देवगड हापुस ची चव

कोका- कोलाचे माझा हे आंब्याच्या रसाचे उत्पादन आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातुन कोका- कोलाला संपर्क केला असुन कोका- कोला ने थेट आंबा घेण्याचे मान्य केले आहे. यामुळे हापुसची चव माझाच्या रुपाने चाखायला मिळणार आहे.

1 COMMENT

  1. हापूस हि आपली ताकत बनली पाहिजे, हि आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलेली भावना मनाला एक ताकत देऊन गेली. कोकणातील शेतकरी राजाच्या हक्कानं साठी आमदार नितेश राणे कायम झटत राहतील. व एक दिवस महाराष्ट्रातील कोकणचा हापूस हिंदुस्तानात ताकत निर्माण करेल ….. जय कुणबी…. जय महाराष्ट्र…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version