Home ताज्या घडामोडी ११४८ एसटी कर्मचारी बडतर्फ

११४८ एसटी कर्मचारी बडतर्फ

2

आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झाल्याप्रकरणी ११४८ एसटीच्या कर्मचा-यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबई- आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झाल्याप्रकरणी ११४८ एसटीच्या कर्मचा-यांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे एसटी कर्मचा-यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या कर्मचा-यांना नैसर्गिक न्याय मिळण्यासाठी त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. तो त्यांना न देताच बडतर्फ करण्यात आले आहे. ही बडतर्फी मागे घ्यावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

वेतनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ८ आणि ९ जून रोजी संप पुकारला होता. या संपात राज्यभरातील एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटनांच्या सहभागाशिवाय झालेल्या या संपामुळे प्रशासन चांगलेच हादरून गेले होते. प्रवाशांनाही या संपाचा फटका बसला होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचा-यांनी हा संप मागे घेतला होता. त्यानंतर अकरा दिवसानंतर बुधवारी एसटी महामंडळाने संपात सहभागी झालेल्या कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला. महामंडळाने राज्यभरातील ११४८ संपकरी कर्मचा-यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे.

विशेष म्हणजे बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये एसटीच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या कर्मचा-यांचा समावेश आहे. महामंडळाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे कर्मचा-यांमध्ये रोष निर्माण झाला असून कामगार संघटनांनी या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपादरम्यान ३७२ कर्मचा-यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. संपाच्या दोन दिवसांत ९३ बस गाडय़ांचे नुकसान झाले होते. यात १९ शिवशाही बस गाडयांचाही समावेश होता. संपामुळे एसटीचा ३३ कोटी रुपयांचा महसूलही बुडाला होता. या सर्व प्रकाराला जबाबदार धरून या कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात दाद मागण्याचे संकेत कामगार संघनांनी दिले आहेत.

2 COMMENTS

  1. बरे झाले, ST महामंडळाला वेठीस धरत होते, सर्व सामान्यांचे हाल होत होते, आता जावा म्हणावं कुठेही आणि तिथे आंदोलन करा म्हणावं, काम करतायत महामंडळात आणि तिथेच आंदोलन, चांगले झाले, बाकीच्यांना पण काढून टाका, नाहक त्रास झालाय ह्या कामगारांचा

    • तू आहेस तरी कोण जे हे बोलतोय तुला थोडी अकल आहे रे त्यांना पैसे किती भेटतात माहीत आहे का तुला बोलताना थोडा विचार करून बोलत जा स्वतःला जास्त शाना समजू नको.तुला काय करायचं रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version