Home देश २०१३ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक दंगली

२०१३ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक दंगली

2

 मागील संपूर्ण वर्षात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २४७ दंगलीच्या घटना घडल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारने राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली – मागील संपूर्ण वर्षात उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २४७ दंगलीच्या घटना घडल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारने राज्यसभेत दिली.केंद्रीय गृहमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी ही आकडेवारी राज्यसभेत सादर केली. संपूर्ण वर्षभरात उत्तर प्रदेशात झालेल्या २४७ दंगलीत ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला.

तर उत्तर प्रदेशपाठोपाठ जातीय दंगलींचे प्रमाण हे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात २०१३ मध्ये ८८ दंगलीच्या घटना घडल्या. त्यानंतर मध्य प्रदेश(८४), कर्नाटक(७३), गुजरात(६८) आणि राजस्थान(५२) दंगलीच्या घटनांची नोंद करण्यात आली.

महाराष्ट्रात झालेल्या ८८ दंगलीमध्ये १२ लोकांचा मृत्यू झाला. तर मध्य प्रदेशमधील दंगलीमध्ये ११ जण मृत्यूमुखी पडले. २०१३ मध्ये झालेल्या दंगलीत उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३६० लोक जखमी झाले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version