Home महामुंबई २०१५ पर्यंत बम्बार्डियर मुंबईकरांच्या सेवेत

२०१५ पर्यंत बम्बार्डियर मुंबईकरांच्या सेवेत

1

मुंबईकरांच्या सेवेत २०१५च्या अखेपर्यंत ७२ बम्बार्डियर लोकल दाखल होणार असल्याचे रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. 

मुंबई- मुंबईकरांच्या सेवेत २०१५च्या अखेपर्यंत ७२ बम्बार्डियर लोकल दाखल होणार असल्याचे रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. पहिल्या-वाहिल्या बम्बार्डियर लोकलच्या रेल्वेतील औपचारिक समावेशासाठी आयोजित सोहळय़ात ते बोलत होते.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रविवारी आयोजित कार्यक्रमाला रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, अल्प संख्याकमंत्री नसीम खान, मुंबईतील खासदार, आमदार उपस्थित होते. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प एमयूटीपी)-२ अंतर्गत बम्बार्डियर लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. तब्बल ३ हजार ४१ कोटींच्या या प्रकल्पाअंतर्गत १२ डब्यांच्या ७२ लोकल चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार केली जात आहेत.

संपूर्ण स्टेनलेस स्टीलने बनवण्यात आलेली बम्बार्डियर लोकल अधिक हलकी व प्रशस्त असणार आहे. रूफ माउंटेड फोस्र्ड वेंटिलेशन सिस्टममुळे प्रती तास १६ हजार घनमीटर ताजी खेळती हवा ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे लोकल प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. बम्बार्डियर लोकलचे आगमन म्हणजे केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने केलेली वचनपूर्ती असल्याचे उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी काढले.

चर्चगेट- विरार उन्नत रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारला रेल्वेला सवरेतोपरी मदत करण्यास तयार असून या प्रकल्पासाठी १३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग, नवी मुंबई व पुणे येथील विमानतळाच्या विकासाचा मुद्दा या भेटीत चर्चिला जाणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version