Home Uncategorized २५ एकरांत २ लाख अननस

२५ एकरांत २ लाख अननस

1

महाराष्ट्राच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या दोडामार्ग तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्यालगत ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात अननस लागवड दिसून येत आहे. मेहनत व खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. या स्थितीत मांगेलीसारख्या गावात केळी लागवड, मसाला पीक आदी पिके घेतली जातात. तर डोंगराच्या खालच्या जंगलभागात अननस लागवड तर वायंगणतड येथे भातशेती पूर्वापार करीत जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेशभाई दळवी यांनी शेतीशी नाळ कायम ठेवली आहे. झरेबांबर येथे त्यांनी २५ एकरात २ लाख अननस लागवड करत शेतक-यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आता शेतक-यांनी फायद्याच्या शेतीकडे वळायला हवे, ती गरज आहे याकडे ते लक्ष वेधतात.

दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयांनी यापूर्वी केळी लागवड २० वर्षापासून सुरू केली ती आता सद्यस्थितीत केळी लागवडीत स्थानिक युवक मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेत आहे. त्यातून दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होऊन रोजगारनिर्मिती झाली आहे, त्याच प्रकारे अननस लागवड ठिकठिकाणी डोंगर-द-यात केरळीयनांकडून केली जाते.

याचा अपवाद दोडामार्गातील प्रगतशील शेतकरी व पिढीजात भातशेती, बागायती असणारे जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी ठरत आहे. त्यांनी झरेबांबर साटेली-भेडशी भागातील आपल्या शेतजमीन २५ एकरांत दोन लाख अननस रोपांची लागवड केली आहे. यासाठी ते अहोरात्र मेहनत घेताना दिसतात.

स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन अननस लागवड व्यावसायिक प्रकारे केल्यास एकंदरीत तीन वर्षात प्रतिवर्ष असे सव्वा कोटी रुपये उत्पादन मिळू शकते, असा दावा सुरेश दळवी यांनी केला आहे. यासाठी आपण बेरोजगार युवकांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील असून तरुणांनी अननस शेतीकडे वळावे. इतर शेतीच्या तुलनेत ही एक फायद्याची शेती असल्याचे ते पटवून देतात. त्यांनी आपल्या बागेत परप्रांतीय कामगार ठेवले असले तरी आपल्या शेतीकडे ते जातीनिशी पाहणी करतात.

सुरेश दळवी यांनी सांगितले की, अननस लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली. सुमारे २५ एकर क्षेत्रात सदर लागवड केली आहे. यासाठी साफसफाई करणे कामी ४,८०,०००, पाईपलाईन प्रिंकलर्स २,५०,०००, अननस रोप १२ ट्रक यासाठी ३,१२,००० तसेच अननस लागवड करण्यासाठी सहा महिन्यांत मंजुरीसाठी रुपये ४,५०,००० वीज कनेक्शन तर ट्रान्सपोर्ट करणे, पाच लाख. तसेच कुंपण व्यवस्था दोन लाख असे मिळून सहा महिन्यांतील २० ते २५ लाखांच्या आसपास खर्च झाला आहे.

तर पीक मिळेपर्यंत आणखी पाच ते सहा लाख खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये औषधे व खतासाठी वार्षिक ७ ते ८ लाख खर्च यामध्ये सामाविष्ट आहे. यासाठी आपण अननसाचे पीक हे या वर्षी एकच फळ प्रति रोप काढणार असल्याचे सांगितले. तर दुस-या वर्षी दोन फळे व तिस-या वर्षी दोन फळे अशी एकूण तीन वर्षात प्रति रोप सरासरी १० अननस फळे मिळणार आहेत. दिवसेंदिवस अननस ज्यूससाठी मोठी मागणी आहे.

तसेच गोवा, बेळगाव, मुंबई व बेंगलोर आदी शहरात औषधी म्हणून याचा वापर होतो. त्यामुळे मागणीनुसार अननस जागेवरच विक्री करून मार्केटिंग करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यासाठी मुंबई मार्केटसह देशभरातील अनेक व्यावसासिकांनी संपर्क साधला असल्याचे ते म्हणाले, सरासरी एक अननस दीड ते दोन किलो असते. बाजारात ५० रुपये भाव मिळणार आहे तसेच हंगामानुसार हे दर कमी अधिक होऊ शकतात.

सरासरी बाजारभावानुसार प्रति अननस ५० रुपये प्रमाणे १० लाख अननसांचे पाच कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये मार्केटिंग ट्रान्सपोर्ट तसेच पॅकिंग व वितरण व्यवस्थासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

ही अननस मार्केटमध्ये विकायला न्यायची गरज नाही तर प्रत्यक्ष जागेवर खरेदी केली जाणार असल्याने मोठय़ा प्रमाणात फायदा अपेक्षित आहे. ही अननस रोपांची बाग वांझा कुलम जातीची असून केरळ येथून प्रति नग सहा रुपये खरेदी केली आहे. तर लागवड करण्यासाठी प्रति नग सरासरी २० रुपये खर्च आला आहे.

त्यातून उत्पादन हे पहिल्या वर्षी कमी त्यानंतर दुस-या वर्षी कमी उत्पादन खर्च असल्याने मोठय़ा प्रमाणात नफा होणार आहे. तर तिस-या वर्षी त्याहून कमी उत्पादन खर्च होत असल्याने जास्त नफा अपेक्षित आहे. यासाठी गादी वाफे व अन्य कामे करावी लागणार आहेत तसेच औषधे, खत, फवारणी व मजुरीसाठीच खर्च करावा लागणार आहे.

शेतीतील तांदूळ मुलांच्या वसतिगृहासाठी
वायंगणतड येथे भातशेती व बागायती आहे त्या ठिकाणी दरवर्षी सुरेश दळवी स्वत: जातीनिशी लक्ष देऊन भातशेतीचे पीक घेतात. लावणी ते कापणीपासून भात मळणी करणे आदींकडे त्यांचा समाजकारण व उद्योग व्यवसायतूनही शेतीकडे विशेष लक्ष असते. तसेच या शेतीतून मिळणारा तांदूळ, कोनाळकट्टा येथील त्यांनी सुरू केलेल्या मुलांच्या वसतिगृहासाठी गोरगरीब मुलांना दिला जातो. यातूनच त्यांची शैक्षणिक व सामाजिक तळमळ लक्षात येते. परिणामी दरवर्षी शेकडो विद्यार्थी मुले-मुली आर्थिक परिस्थती नसल्याने शिक्षणापासून वंचित राहू नयेयासाठी सुरू केलेल्या वसतिगृहाला अन्नधान्यांचा पुरवठा करतात. त्यातून आपणाला समाधान मिळत असल्याचे दळवी यांनी सांगितले.

अननस ज्यूससाठी मोठय़ा प्रमाणात मार्केट उपलब्ध
देशात अननस फळाला मोठय़ा प्रमाणात मागणी असून औषधासाठी व मोठय़ा शहरात हॉस्पिटलसाठी पुरवठा केला जातो. तसेच दररोज ज्यूससाठी वापर केला जातो. हंगामानुसार अननसाला मोठी मागणी असते. त्यातून हे पीक जास्त किफायतशीर आहे. कोकणात डोंगर द-यातील उताराला पाणी साचत नसल्याने अननसाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होऊ शकते, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

यापूर्वी कृषी क्षेत्रात शेतीचे अनेक प्रयोग झाले आहेत. मात्र आमची डोंगराळ शेती आहे. या डोंगर परिसराचा फायदा घेत अननस लागवड करावी असे ठरवले आणि काम सुरू केले. मला खात्री आहे हे पीक कधीच तोटय़ात जात नाही. यामुळे शेतक-यांनी अननस बागेकडे लक्ष द्यायला हवे. तुम्ही जेवढे पैसे या शेतीत ओताल त्याच्या पाचपट उत्पन्न मिळणार याची शाश्वती मी देतो.
– सुरेश दळवी

1 COMMENT

  1. सुरेशभाई दळवी,
    मी अविनाश नाईक दोडामार्ग [ वायंगणतंड ] येथील रहिवासी आहे माझी खनीयलें व शिरंगे गावात जमीन आहे व मला तिथे अननसाची शेती करायची आहे त्यासाठी मला तुमचा सल्ला हवा आहे कृपया मला तुमचा संपर्क क्रमांक किंवा मोबईल नंबर द्याल का?
    माझा संपर्क नंबर ९८७०२८१४९१ व माझा ई-मेल ashwamedhrealtors@gmail.com
    धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version