Home महामुंबई २६ नोव्हेंबर ‘संविधान दिन’ म्हणून देशभर साजरा करणार

२६ नोव्हेंबर ‘संविधान दिन’ म्हणून देशभर साजरा करणार

1

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा करणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मुंबई – २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा करणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सभेत बोलत होते.

भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबरला लिहून पूर्ण केले होते. त्यामुळे हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जाणार, तसेच शाळांमध्ये संविधान कसे तयार झाले, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल, असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

भाजप सरकार आले की विरोधक आरक्षणासंदर्भात संभ्रम पसरवतात. भाजप आरक्षण संपवेल, असे खोटे आरोप केले जातात, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले. तसेच बाबासाहेब पूर्ण देशाचे नेते होते, त्यांना केवळ एका समाजाचे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले.

1 COMMENT

  1. खूप चान वाट्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जाणार असे त्यांनी सांगितल त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version