Home देश ३० वर्षानी लष्कराला मिळाल्या २ तोफा

३० वर्षानी लष्कराला मिळाल्या २ तोफा

1

तब्बल तीन दशकांनी भारतीय लष्कराला दोन नव्या अद्ययावत तोफा (१५५ एम एम आटिलरी गन्स) मिळाल्या आहेत. एम-७७७ या अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफा अमेरिकेतून भारतात सरावासाठी दाखल झाल्या असून नियंत्रण रेषेवर त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

नवी दिल्ली – बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्यानंतर, तब्बल तीन दशकांनी भारतीय लष्कराला दोन नव्या अद्ययावत तोफा (१५५ एम एम आटिलरी गन्स) मिळाल्या आहेत. एम-७७७ या अल्ट्रा लाइट हॉवित्झर तोफा अमेरिकेतून भारतात सरावासाठी दाखल झाल्या असून नियंत्रण रेषेवर त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

भारतीय लष्करासाठी १४५ नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या तोफा खरेदी करणार असल्याचे केंद्र सरकारने गेल्या वर्षी २६ जून रोजी जाहीर केले होते. त्यानंतर, नोव्हेंबरच्या सुरुवातीला भारताने अमेरिकेशी हॉवित्झर तोफांसाठी ७३७ दशलक्ष डॉलर्सचा करार केला. बीएई सिस्टिम्स या कंपनीला तोफा बनवण्याचे काम देण्यात आले होते. त्यापैकीच दोन तोफा ट्रायलसाठी चार्टर्ड विमानाने भारतात पोहोचल्या आहेत. त्या राजस्थानातील पोखरण येथे पाठवण्यात येणार असून तिथे त्यांची चाचणी घेतली जाईल.

२४ ते ४० किलोमीटरपर्यत मारा करण्याची या तोफांची क्षमता आहे. टायटॅनियम पाहून बनवण्यात आल्या असल्याने त्यांचे वजन ४ टनांच्या आसपास आहे. ‘अल्ट्रा लाइट’ गटातील या तोफा १६ हजार फूट उंचीवरील लडाखला किंवा चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (एलएसी) तैनात करता येऊ शकतात.

या तोफांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात आणखी तीन तोफा भारतात येतील. त्यानंतर, मार्च २०१९ ते जून २०२१ पर्यत दर महिन्याला पाच तोफा भारतात पाठवल्या जाणार आहेत. १४५ पैकी १२० तोफांची जोडणी भारतातच केली जाणार असून या कामासाठी बीएई सिस्टिम्सने महिंद्राशी भागीदारी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version