Home देश सलमानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

सलमानला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

1

भरधाव गाडी चालवत २००२मध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली.

नवी दिल्ली- भरधाव गाडी चालवत २००२ मध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

हिट अँड रन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सलमान विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत त्याची सुटका केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने सलमानला नोटीस बजावली.

सलमानच्या लँड क्रूझर गाडीने ८ सप्टेंबर २००२ रोजी वांद्रे येथे फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर चारजण जखमी झाले होते.

[EPSB]

सलमानची सर्वोच्च न्यायालयात धाव

हिट अँड रन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सलमान पुन्हा अडचणीत?

हिट अँन्ड रन प्रकरणी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याने बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. [/EPSB]

1 COMMENT

  1. तू डर मत बेटा !सल्लुभाई ,अभी ये तेरा केस pachhis saal tak चलेगा उस vakt teri oomar ho jayegi
    ७५.साल .uske बाद maanniya rashtrapati teri saja maaf kar dengye,aour tu bindhast हो jayega.
    Ab तो Bol मेरा bharat mahaan!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version