Home टॉप स्टोरी बालकृष्णन यांचे जवानांबाबत बेताल वक्तव्य

बालकृष्णन यांचे जवानांबाबत बेताल वक्तव्य

1

भारतीय लष्कराबद्दल बेताल वक्तव्य करणा-या केरळमधील सीपीएमचे सचिव कोदीयेरी बालकृष्णन यांच्या विरोधात सर्व स्तरातून टीका होत आहे.

तिरुवनंतपुरम- भारतीय लष्कराबद्दल बेताल वक्तव्य करणा-या केरळमधील सीपीएमचे सचिव कोदीयेरी बालकृष्णन यांच्या विरोधात सर्व स्तरातून टीका होत आहे. बालकृष्णन यांनी लष्करावर अपहरण आणि बलात्काराचे गंभीर आरोप केले आहेत.

बालकृष्न एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भारतीय लष्कराला जास्त अधिकार दिले तर ते कोणाबरोबर काहीही करु शकतात. लष्कराचे जवान महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करतील. लष्कराला कन्नूर येथे तैनात केले तर येथील जनतेबरोबर त्यांचा संघर्ष अटळ आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी भाषण करताना केली.

चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र पाहिले तर लष्कर त्यांच्यावर सरळ गोळीबार करते. कोणालाही त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अशी वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी भारतीय लष्कराबद्दल केली आहेत.

1 COMMENT

  1. For such pigs, few slaps & few kicks on ass and put him in jail. Publish his video while breaking stones. No point wasting our time in critsizing …… nothing is going to happen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version