Home देश धुळयाचे जवान चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न

धुळयाचे जवान चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न

1

पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेले ३७ राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेले ३७ राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. यासाठी राजनैतिक पावले उचलण्यास सरकारने सुरुवात केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून विचारपूस केली.

चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. चंदू चव्हाण यांच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाले. त्यामुळे चंदू व त्याचा भाऊ भूषण याचे पालनपोषण आजी-आजोबांनी केले.

सध्या आजी-आजोबा गुजरातमधील जामनगरमध्ये राहतात. चंदू यांचे मोठे भाऊ भूषण हे ही लष्करात आहेत. चव्हाण यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचे कळताच त्यांच्या आजीचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. चव्हाण यांना पाकिस्तानी सैन्याने सैन्याचे मुख्यालय असलेल्या नियाकलमध्ये ठेवले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version