Home एक्सक्लूसीव्ह ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाकडे ७१,४७३ तक्रारी

‘कार्यक्षम’ मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाकडे ७१,४७३ तक्रारी

1

राज्यातून नागरिकांच्या येणा-या तक्रारींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाकडे येणा-या तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. 

मुंबई-  राज्यातून नागरिकांच्या येणा-या तक्रारींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाकडे येणा-या तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. भाजपा सरकारच्या २० महिन्यांच्या कालखंडात राज्य सरकारकडे २ लाख ४४ हजार तक्रारी आल्या असून त्यातील ७१,४७५ तक्रारी गृहविभागाकडे आल्या आहेत. इतर विभागांमध्ये महसूल, नगरविकास, ग्रामविकास आणि सामान्य प्रशासन विभागाचा समावेश आहे.

भाजपाचे सरकार आल्यापासून राज्य सरकारकडे किती तक्रारी आल्या आणि त्याचा निपटारा कसा करण्यात येत आहे, याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात विचारली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी तथा माहिती अधिकारी वैशाली चवाथे यांनी माहिती दिली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत २ लाख ४४ हजार तक्रारी मिळाल्या आहेत. त्यातील ७१,४७५ तक्रारी या गृहविभागाकडे आहेत. महसूल आणि वन विभागांकडे आलेल्या तक्रारी २४,२९३ असल्याची माहिती सरकारने दिली.

मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना आणि सचिवांना आपापल्या विभागाकडे आलेल्या तक्रारींचा जिथल्या तिथे निपटारा करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

1 COMMENT

  1. कोणत्याही तक्रारीला योग्य उत्तर दिल जात नाही. फक्त अंधाधुंद कारभार आहे. मी एक तक्रार गृह खात्याकडे केली. माझं काम तर झालं नाहीच. पण केल्यासारखं दाखवलं. म्हणजे हे बोलायला मोकळे कि आम्ही करून दाखवलं म्हणून. पण झालं काय तर 0…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version