Home Uncategorized असा आहे अर्थक्रांतीचा १६ वर्षाचा प्रवास

असा आहे अर्थक्रांतीचा १६ वर्षाचा प्रवास

7

अर्थक्रांती प्रतिष्ठान ही मुंबईत नोंदणी झालेली स्वयंसेवी संस्था आहे. आपल्या देशात जे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्याचे मूळ पैशांच्या अव्यवस्थेत कसे आहे आणि तिच्यावर कोणते ‘ऑपरेशन’ केले तर चांगली व्यवस्था येऊ शकते, याची मांडणी गेली १६ वर्षे अर्थक्रांती करते आहे. चलन हे विनिमयाचे माध्यम आहे, पण ते आज वस्तू म्हणून वापरले जात असल्याने देशात आजचा आर्थिक गोंधळ माजला आहे, तो समूळ कसा थांबेल, हे अर्थक्रांती आपल्या पाच प्रस्तावांच्या मार्गाने सांगते.

भारतात भांडवल अशुद्ध झाल्याने आणि ते जगाच्या तुलनेत प्रचंड महाग असल्याने भारत जागतिक स्पर्धेत मागे राहतो आहे. तर त्यामुळेच देशात संधी कमी तयार होत असल्याने भेदभाव वाढीस लागला आहे. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे, पण आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे जीवन जगताना मनाला न पटणा-या अनेक तडजोडी कराव्या लागतात.

त्यामुळे आपला चांगल्या बदलावरील विश्वासही कमी झाला आहे. या पाच प्रस्तावांची देशात अंमलबजावणी केल्यास व्यवस्थेचे बहुतांश प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, भारतीय माणसाच्या वृत्तीत दोष असल्याने आपले प्रश्न निर्माण झाले नसून वाईट व्यवस्थेने भारतीय माणसाच्या वृत्तीवर विपरीत परिणाम केले आहेत, असे अर्थक्रांती मानते तसेच भारतासारखा दुसरा देश जगात नसल्याने आपले प्रश्न आपण आपल्याच पद्धतीने सोडविले पाहिजेत, असा आग्रह धरते आणि तो बदल कसा शक्य आहे, याची शास्त्रशुद्ध मांडणी करते.

माणसांत जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, विशिष्ट राजकीय पक्ष, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद न करता प्रत्येक माणसाला मानवी प्रतिष्ठा आणि अर्थपूर्ण जीवन जगता यावे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेली ही चळवळ आहे.

अर्थक्रांतीचे पाच प्रस्ताव कोणते?

सध्या अस्तित्वात असलेली करप्रणाली (केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाचे सर्व कर) पूर्णत: रद्द करणे (आयात कर अथवा कस्टम डय़ुटी वगळता) देशातील सर्व म्हणजे केंद्र, राज्य आणि पालिकांचे, असे सुमारे ३२ कर सध्या आपण भरतो.

सरकारी महसुलासाठी फक्त ‘बँक व्यवहार कर’ सिंगल पॉइंट डिड्क्शन टॅक्स लागू करणे. बँकेद्वारे होणा-या प्रत्येक व्यवहारावर एका निश्चित प्रमाणात वजावट करणे, (उदा. २ टक्के प्रति व्यवहार) वजावट फक्त जमा खात्यावरच (रिसीव्हिंग एन्ड अकौंट्लाच) व्हावी, ही २ टक्के वजावट निश्चित प्रमाणात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन व त्या विवक्षित बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी. (उदा.०.७० टक्के केंद्र, ०.६० टक्के राज्य सरकार, ०.३५ टक्के स्थानिक प्रशासन संस्था व ०.३५ टक्के बँक)

सध्या चलनात असलेल्या रु. ५०पेक्षा जास्त दर्शनी मूल्य असलेल्या चलनाचे उच्चाटन करणे. (यामुळे लोकांना बँकेमार्फत व्यवहार करणेच सोयीचे होईल. परिणामी शासनाच्या महसुलात लक्षणीय वाढ होईल) काळया पैशाचा राक्षस उभा करणा-या मोठया नोटा (१००,५००,१००० रु.) चलनातून काढून टाकण्यात येतील. जगात बहुतांश प्रगत देशांमध्ये अशा मोठ्या नोटा नाहीत.

शासनाची काही विशिष्ट आर्थिक मर्यादेपर्यंतच रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर मान्यता अपेक्षित (जसे रु. २००० पर्यंतचे व्यवहार). अर्थातच या मर्यादेपुढील रोखीच्या व्यवहारांना कायदेशीर संरक्षण मिळू शकणार नाही. अशा रोख व्यवहार मर्यादा निश्चितीकरणामुळे बँक व्यवहारास म्हणजे पारदर्शकतेला चालना मिळून शासकीय महसुलात लक्षणीय वाढ आणि लाचखोरीला आळा) रोखीच्या कुठल्याही व्यवहारावर ‘बँक व्यवहार कर’ लागू असणार नाही. (याचा अर्थ सुरुवातीच्या टप्प्यात देशातील जे नागरिक बँकिंग करू शकणार नाहीत किंवा ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ते नागरिक ५० रुपये आणि त्यापेक्षा कमी मूल्यांच्या नोटांत व्यवहार करू शकतील. त्यांना कर यासाठी नाही की त्यांची क्रयशक्ती मुळातच कमी असल्याने ती हिरावून घेण्याचे काही कारण नाही.

जेव्हा त्यांचे उत्पन्न वाढेल तेव्हा ते आपोआपच कर भरण्याच्या पात्रतेत येतील) अर्थक्रांती हे व्यवस्थेतील मोठे करेक्शन आहे, त्यामुळे त्या अमूलाग्र बदलासाठी काय काय करावे लागेल, याचा अर्थक्रांतीने बारकाईने विचार केला आहे. जसे की, सरकारचा महसूल वाढल्यानंतर मतदानाच्या टक्केवारीनुसार राजकीय पक्षांना शुद्ध पैसा पुरविला जाईल. त्यामुळे काळया पैशांच्या निर्मितीच्या मुळावरच घाव घातला जाईल. तर ज्यांच्याकडे सध्या प्रचंड काळा पैसा आहे, त्यांना एक शेवटची संधी म्हणून त्यातून योग्य तो कर कापून तो बँकेत जमा करून घेतला जाईल. उर्वरित स्वच्छ झालेला पैसा त्यांना टप्प्याटप्प्याने दिला जाईल. अशा काही मार्गाचा समावेश आहे.

आतापर्यंत अर्थक्रांतीचा देशात किती प्रसार झाला आहे?

अर्थक्रांतीचा प्रसार देशभर झाला असून ज्यांना या विषयाचे महत्त्व कळाले असे हजारो नागरिक हा अमूलाग्र बदल आपल्या देशात व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील सर्व प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांना अर्थक्रांती माहीत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये (ते मुख्यमंत्री असताना) अहमदाबादच्या सचिवालयात अनिल बोकील यांच्याकडून दोन तास ती समजून घेतली आणि या संदर्भात आपल्याला जे शक्य आहे, ते मी जरूर करेन, असे आश्वासन दिले होते. त्याचा प्रत्यय ते सत्तेवर येताच त्यांनी प्राधान्याने सुरू केलेल्या पंतप्रधान जन धन योजना आणि डिजिटल व्यवहारांच्या प्रसाराला त्यांनी दिलेल्या गतीतून आलाच आहे.

अर्थात आज सरकार अर्थक्रांतीविषयी थेट काही बोलत नसले तरी ‘बँकिंगच्या प्रसारानंतर अर्थक्रांती शक्य आहे’ असे विधान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इकॉनॉमिक्स टाइम्सच्या २०१५ च्या ग्लोबल समीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केले आहे.

अर्थक्रांती ज्यांनी जाणून घेतली त्यातील प्रमुख नावे अशी: लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, शरद पवार, सुब्रमण्यम स्वामी, नितीन गडकरी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, रामोजी फिल्मसिटीचे रामोजी राव, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राज ठाकरे, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अर्थक्रांतीचे सादरीकरण राजस्थानच्या राजभवनात घडवून आणले होते आणि ते संसदेत सर्व खासदारांसमोर ठेवण्यात यावे, असे पत्र ७ मार्च २००७ ला सभापती सोमनाथ चटर्जी यांना दिले. पण असे सादरीकरण अद्याप होऊ शकलेले नाही.

न्यूयॉर्कच्या Fordham University ¹fZ±fZ Institute for Ethics and Economic Policy and Professor of Economics २चे संचालक असलेल्या डॉ. ऋषीकेश विनोद यांनी लिहिलेल्या Handbook of Hindu Economics and Business’ या पुस्तकात ARTHAKRANTI PERSPECTIVE ON THE INDIAN AND GLOBAL ECONOMY’ या नावाने अर्थक्रांतीवर प्रसिद्ध झालेल्या लेखाला पुस्तकातील सर्वाधिक पाने देण्यात आली आहेत.
(प्रसिद्धी २७ मार्च २०१३)

आतापर्यंत अर्थक्रांतीचा प्रसार कोणकोणत्या मार्गाने करण्यात आला आहे? आपल्या देशातील आर्थिक साक्षरतेअभावी सुरुवातीच्या काळात अर्थक्रांतीच्या प्रसाराला मर्यादा आल्या होत्या, मात्र अलीकडे आर्थिक घटना घडामोडींचे महत्त्व वाढल्याने आणि अर्थकारण कसे सुधारेल तसेच काळ्या पैशांची निर्मिती कशी थांबेल, हा जागतिक विषय झाल्याने अर्थक्रांतीची सादरीकरणे जगभर होत आहेत. अशी छोटी मोठी पाच हजार सादरीकरणे आतापर्यंत झाली आहेत.

अर्थक्रांती म्हणजे काय हे सांगणारी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांत पुस्तके आहेत. अर्थपूर्ण हे मराठीतील मासिक अर्थक्रांतीच्या प्रसारासाठी आणि आर्थिक साक्षरतेसाठी २०१०ला सुरू झाले. www.arthakranti.org आणि www.arthapurna.org या दोन वेबसाईट आहेत. अर्थक्रांतीसंदर्भात काही छोटया फिल्मही आहेत. जुलै २०१२ मध्ये अर्थक्रांतीच्या प्रसारासाठी समर्पण यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या अखेरीस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, रामदेवबाबा, त्यावेळेचे राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि श्री श्री रविशंकर यांना देशासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

मोठया तसेच बनावट नोटांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच अर्थक्रांतीविषयी सरकारला मत देण्यासाठी १४ ऑगस्ट २०१५ ला ‘चलो आरबी मार्च’ काढण्यात आला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिका-यांनी दोन तास अर्थक्रांती जाणून घेतली, त्यांनी वैयक्तिक सहमती दाखविली, मात्र आमचे हात बांधलेले असून हा केंद्र सरकारचा विषय आहे, असे सांगितले.

७, ८ मे २०१६ रोजी मंगळूर येथे अर्थक्रांती एकता मीट झाली. पुणे, औरंगाबाद, नाशिक, सांगली-मिरज, अकोला येथे अर्थक्रांतीवर शिबिरे आणि अधिवेशने झाली आहेत.

अंमलबजावणी व्हावी, यासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत?

या विषयाच्या वेगाने प्रसारासाठी सोशल मीडियाचा व्यापक वापर तसेच चित्रपटाची आणि टीव्ही मालिकांची चाचपणी काही नागरिक सध्या करीत आहेत. आगामी दोन वर्षात अर्थक्रांतीचे विधेयक संसदेत सादर केले जावे आणि त्यावर चर्चा व्हावी, यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन वर्षानी ‘चलो दिल्ली मार्च’ काढण्याची आणि तेथे देशभरातून हजारो नागरिक एकत्र यावेत, असा विचार अर्थक्रांतीसाठी काम करणारे नागरिक सध्या करत आहेत.

अर्थक्रांती चळवळीत मी कसा भाग घेऊ शकतो?

अर्थक्रांतीच्या अंमलबजावणीमुळे सर्व देशात स्वच्छ व्यवहार सुरू होणार असल्याने तसेच काळा पैसा निर्माणच होणार नसल्याने सर्वाना शांत, समृद्ध, भेदभावमुक्त आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी मिळणार आहे. ही लढाई सर्व १३१ कोटी भारतीय नागरिकांची आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक अर्थक्रांतीचा जन्मत:च सदस्य आहे. अर्थक्रांती कोणतीही देणगी घेत नाही. जे घेतले किंवा दिले जाते, ते त्या विशिष्ट उपक्रमासाठीचे योगदान असते. या योगदानावरच अर्थक्रांती चळवळ गेली १६ वर्षे वाढते आहे.

आपल्याला या चळवळीत सक्रिय होण्यासाठी आपण अर्थपूर्णचे सदस्य होऊ शकता, अर्थक्रांतीची पुस्तके, साहित्य मित्र, सहका-यांना भेट देऊ शकता, अर्थक्रांतीची सादरीकरणे ठिकठिकाणी घडवून आणू शकता तसेच या विषयावर दररोज आपल्या किमान एका देशबांधवाला जागरूक करू शकता. भारतीय नागरिक जगण्याच्या शर्यतीत व्यस्त आहेत, तरीही दैनंदिन जीवनात आपण व्यस्त असतानाही मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेतल्याशिवाय आपण आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकत नाही.

अर्थक्रांतीचेही तसेच आहे. आपण आपापल्या समूहात वेगवेगळ्या भूमिका बजावत असलो तरी निखळ भारतीय म्हणून भेदभावमुक्त व्यवस्थेसाठी आपण प्रयत्न करतच राहिले पाहिजे. अर्थक्रांतीची माहिती मिळण्यासाठी कोठे संपर्क साधला पाहिजे? पुण्यात ११, हर्षदा, रामबाग कॉलनी, पौड रोड, पुणे – ४११ ०३८ या पत्त्यावर अर्थक्रांती, अर्थपूर्णचे कार्यालय आहे. (फोन – ०२० २५४ ३०५४०) शिवाय, अर्थपूर्ण मासिकात भविष्यातील उपक्रमांची माहिती नियमित दिली जाते. एक भारतीय नागरिक म्हणून अर्थक्रांती या देशव्यापी आणि ऐतिहासिक चळवळीत आपले स्वागत आहे.

(अर्थक्रांतीला आजच्या समाजातील कोणतेही भेदभाव मान्य नाहीत, त्यामुळे असे भेदभाव मान्य करणारे नागरिक, संस्था, पक्ष आणि संघटना यांच्याशी अर्थक्रांतीचा काहीही संबंध नाही.)

7 COMMENTS

  1. मला हे सर्व माझा एफ बी वर अपलोड करायचे आहे मी ते कसे करू शकतो हि सर्व अर्थ क्रांती ची माहिती सर्वाना भेटली पाहिजे

  2. मला खूप आवडली हि अर्थ क्रांती
    असच व्हायला हवे.
    देशाने आता एकत्र यायला हवे.

  3. aaj aplle chalan je waste hote ahe.tyavar marg kay? typeksha black money wale je ahet tyana tyancha black money new a/c var jama karnes snagun to paisa garibasathi or vikasasathi vaparava. tasech tyavar enquiry hou naye. cashless mostly mobile to mobile transaction lavakarat lavkar anave. jyane karun corruption lavkarat lavkar kami hoil

  4. मला “अर्थक्रांती” ने भारावून टाकले आहे.
    अर्थक्रांती पुस्तक हवे आहे कसे मिळेल ते कळवा.

  5. मला अर्थक्रांती हि यौजना आवडली आहे देशातील काळ्या पैसे वाल्याना २०० टक्के दंड लावलाच पाहिजे माझ्याकडून
    नेरंद्र मोदींना हार्दिक अभिनंदन आम्ही सामान्य जनता आपल्या पाठीशी आहोत

  6. मी अर्थक्रांतीच्या ५ अंमलबजावणी प्रस्तावाने भारावून गेलोय. अरूण बोकील सरांचा प्रचंड चाहता आहे. मला एक प्रश्न पडला आहे की जर आपल्या देशात समांतर अर्थ व्यवस्थेमुळे महागाई, दारिद्रय रेषा वाढलेली आहे तर आपण विजय मल्ल्या यांचा जाहीर सत्कार करण्यात आला पाहिजे कारण त्यांनी आपल्या महा बँकेतील कोटयावधी पैसा म्हणजेच जो तुंबलेल्या पैशाचा किंवा जाणुन बुजून गोठलेल्या पैशाचा घोटाळा करून फसगत करून समांतर अर्थ व्यवस्थेला चांगली अददल घडवली अस नाही का वाटत?
    वरील विचार हे अरूण बोकील यांची माझा कट्टा मधील मुलाखत पाहून सुचले
    अर्थक्रांतीने पछाडलेला चाहता
    दुर्गेश साळस्कर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version