Home महाराष्ट्र ईव्हीएमची अकोलेत प्रेतयात्रा

ईव्हीएमची अकोलेत प्रेतयात्रा

1

अकोला महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमची अंत्ययात्रा काढली.

नागपूर- अकोला महानगरपालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे (ईव्हीएम) मतमोजणीत गोंधळ झाल्याचा आरोप करीत, सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमची अंत्ययात्रा काढली.

अकोला महानगरपालिकेच्या मतदानाची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. मशीनमध्ये सेटिंग करून निवडणुकीचे निकाल बदलले, असा आरोप होत आहेत. याच मुद्यावरून पराभूत उमेदवारांनी एल्गार पुकारला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप व शिवसेना या पक्षांसह अपक्ष पराभूत उमेदवार सहभागी झाले.

ईव्हीएमव्दारे मतमोजणीचा निषेध करह्यत ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव,निवडणूक रद्द करुन मतपत्रिकांव्दारे मतदान घ्या, मतदानाचा अधिकार जतन करा-हुकूमशाही बंद करा अशा घोषणा देत काढण्यात आलेली प्रतिकात्मक प्रेतयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर ईव्हीएम विरोधी संघर्ष कृती समितीच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले.

या प्रतिकात्मक प्रेतयात्रेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिप-बमसंचे गजानन गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, शिवसेनेचे तरुण बगेरे, स्वाती देशमुख, महेश गणगणे, रफीक सिद्दिकी, कपिल रावदेव, पंकज साबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादराव मते पाटील, राजेंद्र इंगोले, रामा तायडे, प्रतिभा अवचार, प्रशांत भारसाकळ, वंदना वासनिक, मनिष मोहोड,अरुंधती शिरसाट, मंगला घाटोळे, जीवन डिगे, विकास सदांशिव, मुकीम अहमद, सोमनाथ अडगावकर, बाळासाहेब इंगळे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version