Home मध्यंतर सुखदा डोळ्यांचं सौंदर्य खुलवी लायनर

डोळ्यांचं सौंदर्य खुलवी लायनर

1

तुम्हाला लायनर लावायचं असेल तर सर्वप्रथम कोणत्या प्रकारचं लायनर लावायचं याचा विचार करा. पहिल्यांदाच लायनर लावणार असलात तर तुम्ही पेन्सिल लायनरचाच वापर करा. 

तुम्हाला लायनर लावायचं असेल तर सर्वप्रथम कोणत्या प्रकारचं लायनर लावायचं याचा विचार करा. पहिल्यांदाच लायनर लावणार असलात तर तुम्ही पेन्सिल लायनरचाच वापर करा. कारण लिक्विड लायनर लावायचं म्हणजे तुमचा हात थरथरतो किंवा ते बाहेर येण्याची शक्यता असते. लावून झाल्यावर डोळ्यांची उघडझाप केली तर लायनर बाहेर आलंच म्हणून समजा. म्हणूनच पेन्सिल लायनरचा वापर करा. म्हणजे लायनर लावणं अधिक सोपं होईल. कारण यामुळे लायनर बाहेर येण्याचा प्रश्नच येत नाही.

लायनर लावताना आरसा, लायनर आणि मेकअप रिमुव्हर अवश्य सोबत ठेवा. मेकअप रिमुव्हर ठेवल्याने नीट लागलं नाही तर तुम्हाला ते लगेच पुसता येतं. अगदी बाहेर जायच्या वेळी किंवा बाकीचा सगळा मेकअप झाल्यावर मग लायनर लावण्याचं टाळाच. तुम्हाला हवं तसं दिसावं यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.

तुमच्यापैकी कित्येकांना ते पहिल्या झटक्यातच येईल किंवा कित्येकांना ब-याचदा लावावं लागेल. दोन-चार वेळा लावावं लागत असेल तर ते पुसताना तुमचा बाकीचा मेकअप तुम्हाला पुसावा लागत असेल. तुम्ही जर बाहेर जाताना घाईघाईत लावलंत तर तुम्हाला घराबाहेर पडताना जरा गोंधळायला होईल. म्हणून लावून झाल्यावर थोडा वेळ थांबा.

लायनर लावण्याची पद्धती

  • आरसा, लायनर आणि या टिप्स सोबत घेऊन बसा.
  • सरळ आरसात बघू नका, डोकं काहीसं मागे न्या आणि मग आरशात पाहा. यामुळे तुमचे डोळे अर्धवट मिटलेले तुम्हाला दिसतील. जेणेकरून तुम्हाला तुमच्या पापण्या दिसतील.
  • आयशॅडो लावताना कसा डोळा बंद करतात त्याप्रमाणे आता एक डोळा बंद करा. दुसरा डोळा उघडा ठेवा म्हणजे तुम्हाला तुम्ही लायनर कसं लावताय हे कळेल.
  • ज्या हातात लायनर नसेल त्या हाताने डोळा कोप-यातून थोडा खेचावा. म्हणजे पापणी ताठ दिसेल. म्हणजे लायनर लावणं सोपं होईल.
  • दुसरा पर्याय म्हणजे, थोडं डोकं मागे न्या. आणि खाली बघा. तेव्हाच तुमच्या पापणी किंवा डोळ्यांजवळची त्वचा खेचा म्हणजे पापणीची त्वचा घट्ट होईल आणि तुमचे डोळे काहीसे उघडेच राहतील. कदाचित तुमच्यापैकी कित्येकांना असं राहणं अधिक सोपं होईल.
  • आणि असं काही करायचं नसेल तर सरळ पेन्सिल लायनर लावावं. 
  • या वर दिलेल्यांपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version