Home टॉप स्टोरी नवरा-बायको राजी, तर आठवडय़ात घटस्फोट

नवरा-बायको राजी, तर आठवडय़ात घटस्फोट

5

नवरा आणि बायको दोघेही परस्पर सामंजस्याने एकामेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास यापुढे त्यांना औपचारिकपणे घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिने थांबण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली- नवरा आणि बायको दोघेही परस्पर सामंजस्याने एकामेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास यापुढे त्यांना औपचारिकपणे घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिने थांबण्याची गरज पडणार नाही. दोघांचीही घटस्फोटाला मान्यता असेल तर आठवडय़ातच घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल पुढील काळात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या जोडप्याला घटस्फोट हवा असेल, तर त्यासाठी अर्ज केल्यानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी दोघांना दिला जातो.

समुपदेशनासाठी हा कालावधी राखीव ठेवला जातो. त्यानंतरही घटस्फोटाचा निर्णय कायम राहिल्यास संबंधित जोडप्याच्या घटस्फोटाला कायदेशीरपणे मंजुरी दिली जाते. पण यासंदर्भात दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादे जोडपे घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीही वर्षभरापासून विभक्तपणे राहत असेल, त्याचबरोबर घटस्फोट घेण्याला नवरा आणि बायको या दोघांचीही मंजुरी असेल, तसेच अपत्याचे पालकत्व कोणाकडे असेल, यावरही दोघांमध्ये सहमती असेल, तर अशा स्थितीत सहा महिन्यांच्या कालावधीची अट शिथिल केली जाऊ शकते. अशा जोडप्याला आठवडय़ाच्या आत घटस्फोट दिला जाऊ शकतो.

त्यामुळे पुढील औपचारिकतांची पूर्तताही लवकर केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात न्यायमूर्ती ए. के. गोयल आणि न्या. यू. यू. ललित म्हणाले की, एखाद्या जोडप्याने  घाईगडबडीत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊ नये. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या काळात दोघांनीही परस्परांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे अपेक्षित आहे. समुपदेशनाचाही यासाठी दोघांना उपयोग होऊ शकतो. पण परस्पर सहमतीने आणि पूर्ण विचार करून घटस्फोट घेऊ इच्छिणा-या जोडप्यांसाठी हा कालावधी बंधनकारक करता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय द्यावा. हिंदू विवाह कायद्यातील कलम १३(ब)२ नुसार सहा ते १८ महिन्यांच्या कालावधीत नवरा आणि बायको या दोघांनीही घटस्फोटासाठीचा आपला अर्ज मागे घेतला नाही. तर अशा स्थितीत न्यायालय त्यांना घटस्फोट मंजूर करून एकमेकांपासून विभक्त करू शकते.

[EPSB]

सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटची तीव्रता वाढली

 गेल्या आठवडय़ात धुवांधार पावसाने विश्रांती घेताच वातावरण तापू लागले आहे.

[/EPSB]

5 COMMENTS

  1. दोन्ही राजी असतांना उशिरा का होईना घटस्फोट मिळतोच
    परंतु बयको राजी नसेल तर मिळत नाही.याउलट बायकोला घटस्फोट हवा असल्यास तो सहज मिळतो.
    नवरा आपल्या बायकोपासून कित्येक दिवस वेगळा असतो खावटी चालू असते पण त्याला घटस्फोट मिळत नाही.1-2 वर्ष वेगवेगळे राहून जिवन जगणा-या माणसाला सहज घटस्फोट मिळायला हवाा .काही अपत्य असल्यास तो त्यचा संभाळ करेल .

  2. जर पती पत्नी चे ऐक मेकांशी जमत नसेल आणि पत्नी प्रत्येक वेळी पती ला त्रास देत असेल तर मग काय करावे, अशा वेळी जर त्याला विभक्त होण्या शिवाय पर्याय नसेल तर काय करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version