Home टॉप स्टोरी बदला घेण्याचा आयएसआयचा कट

बदला घेण्याचा आयएसआयचा कट

1

भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा बदला घेण्याचा कट आयएसआयने आखला असून हल्ल्याची सूत्रे क्रूर दहशतवादी मुस्ताककडे सोपवली आहे.

नवी दिल्ली- भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणा-या जुन्या दहशतवाद्यांना सक्रिय करण्याचा कट आखला आहे. कंदाहार विमान अपहरणातून सुटका झालेला क्रूर दहशतवादी मुश्ताक झरगरकडे दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी आयएसआयने सोपवल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

पाकव्याप्त काश्मिरात भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा बदला घेण्याचा कट आयएसआयने आखला आहे. यासाठी कंदाहार विमान अपहरणातून सुटका झालेला दहशतवादी झरगरकडे ही जबाबदारी सोपवली आहे. अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी झरगर सध्या काम करतो. तो मूळचा श्रीनगरचा असून सध्या तो पाकव्याप्त काश्मिरात राहतो. त्याच्या ४० हून अधिक हत्यांचे आरोप त्याच्यावर आहेत.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयने आता जुन्या दहशतवाद्यांना सक्रिय करण्याचे ठरवले आहे. अल उमर मुजाहिदीन, हरकत उल अन्सार, हरकत उल मुजाहिदीन, इख्वानल अल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिदीन आदी दहशतवादी संघटनांवर काश्मीरच्या बाहेर हल्ले करण्याची जबाबदारी सोपवली आहे. काश्मीर खो-यात सध्या २५० दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांवर हल्ले करून लपण्याचे आदेश दिले आहेत. काश्मीरात दगडफेक करणा-या युवकांमध्ये घुसून सुरक्षा दलांवर हातबॉम्ब फेकण्याचा नवीन कट आखला आहे. श्रीनगरच्या जाकुरा भागात शस्त्र सुरक्षा दलावर हातबॉम्ब फेकण्याची जबाबदारी झरगरच्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली.

अल उमर मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना कायम लष्करावर हल्ले करत आली आहे. मात्र, त्यांनी अनेकदा त्याची जबाबदारी नाकारली होती. सर्जिकल हल्ल्यानंतर आयएसआय संतापली असून दहशतवाद्यांना रोज नवीन कट आखून देत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version