Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती कुलदैवत अन् त्यांची उपासना

कुलदैवत अन् त्यांची उपासना

1

आपल्या महाराष्ट्रात कुलस्वामिनी आणि कुलदेव यांची खूप मोठी परंपरा आहे. त्यापैकी काही ठरावीक कुलदेव आणि त्यांच्या उपासनेची ही थोडक्यात माहिती.

खंडोबा

मल्हारी मरतड भैरवांचे प्रसिद्ध स्थान म्हणजे जेजुरीचा खंडोबा. महाराष्ट्रात खंडोबा हे चातुर्वण्र्याचे कुलदैवत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, दलित या सर्व समाजात आपल्याला खंडोबा कुलस्वामी व तुळजाभवानी कुलस्वामिनी पाहावयास मिळते.

उपासना :- मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सहा दिवस कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाच्या टाक/ मूर्ती स्वच्छ करून त्यांची स्थापना करून देवी नवरात्रीप्रमाणे सहा दिवस माळ बांधतात. सहा दिवस घरातील मुख्य व्यक्ती उपवास करतात.

मल्हारी महात्म्य ग्रंथाचे वाचन करतात. सहावा दिवस, चंपाषष्ठीला देवांना अभिषेक करून पूजापाठ झाल्यावर दिवटी कंदलीसह पंचारती होते; त्यानंतर पुरण वरणाचा नवेद्य दाखवून हळद व खोबरे घेऊन तळी भरतात व देवाचे नामस्मरण करतात.

‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’, ‘खंडोबाच्या नावाने चांगभलं’ (चांगभलं हा शब्द हिंदीमध्ये चंगेभले या अर्थाने, विचारपूस सर्वाचं चांगलं व्हावं अशा अर्थाने आलेला आहे.) जयघोषानंतर हरिद्राचुर्णात मढलेल्या सुक्या खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे देवाची उपासना करावी.

चैत्र पौर्णिमा, आषाढ शुद्ध प्रतिपदा, चंपाषष्ठी, पौष पौर्णिमा, माघ पौर्णिमा, महाशिवरात्र, सोमवती अमावस्या या दिवशी खंडोबाच्या यात्रा भरतात व उपासना करणा-या सर्व उपासकांनी या दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुळाचार करून नामस्मरण, जागरण करून आनंदोत्सव साजरा करावा.

ज्योतिबा

वाडी-रत्नागिरी, कोल्हापूर. कोल्हापूर पंचक्रोशितील बहुतांश कुळांचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे. ज्योतिबा हा खंडोबाचाच अवतार. ज्योतिबा अग्निदेव ज्योतिस्वरूप म्हणून शिवाचे या ठिकाणी ज्योतिबाच्या दर्शनाआधी नंदादीपातील ज्योतीचे दर्शन व बरोबर काळभैरवाचे पूजन करूनच भक्त ज्योतिबाचे दर्शन करतात.

कुळाचार उपासना

चैत्र पौर्णिमेला हस्त नक्षत्री यात्रा भरते. देवाची पालखी निघते व या वेळेस उंच उंच काटय़ा निशाण व ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या जयघोषाने आसमंत भरून आणि भारून जातो अशा प्रकारे देवाचा कुळाचार होतो. रविवारी देवाला नवेद्य दाखविण्याचा प्रघात आहे.
रविवारी देवतेचे पूजन करून नामस्मरण करावे. आपल्या प्रकृतीप्रमाणे उपवास करून नवेद्य दाखवून उपासना करावी. ज्योतिबा कुलदेवतेचे मानकरी ग्वाल्हेरचे िशदे व कोल्हापूरचे छत्रपती.

उमामहेश्वर 
चंद्रवंशामध्ये गाग्र्य व मरकडेय ऋषींच्या गोत्रातील कुळांचे कुलदैवत उदा. अहिरराव, आंग्र, खैर, जगदळे, ढवळे, दरबारे, पालवे, पिंगळे, फाळके, मोहिते, रेणुसे अंतर्गत कुळी असणाऱ्या कुलांचे कुलदैवत आहे.

कुळाचार उपासना

खंडोबाप्रमाणे

श्री मोहिनीराज

मल्हारी मरतड खंडेरायाची ही सासुरवाडी. म्हाळसा आईचं माहेर नेवासे हे शिवतीर्थ असल्यामुळे पूर्वी येथे पादत्राणे वापरत नसत. या ठिकाणीही खंडोबाची मोठी यात्रा भरते. म्हाळसा आदिशक्तीचे हे स्थान अर्धनारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील अनेक लोकांचे हे कुलदैवत आहे.

कुळाचार उपासना

माघ अष्टमी पौर्णिमा उत्सव असतो. पौर्णिमेला कुळाचार केला जातो. या ठिकाणी जळते कुंड हातात घेऊन भक्त नाचतात. यास भळदे म्हणतात. दुस-या दिवशी सरकारी अधिकारी देवतेचे पूजन करतात. येथील मानकरी-देशपांडे, निकम, देशमुख व मोहिते.

शिखर शिंगणापूर

सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे स्थान या ठिकाणी शिव-पार्वती हे लिंग रूपाने अवतीर्ण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत आहे.

कुळाचार उपासना

चैत्र शुद्ध पंचमीस यात्रा भरते. शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पाडतात. कावडीने पाणी आणून कावडीने अभिषेक करण्याची प्रथा आहे. तसेच या ठिकाणी असणाऱ्या गुप्तिलगाचे पूजन व दर्शन झाल्याशिवाय कुळाचार पूर्ण होत नाही. शिव-पार्वतीच्या मीलनाची साक्ष म्हणून या ठिकाणी गुप्तिलग, गोमुखातून अविरत झरणारे पाणी व शिव-पार्वती यांची दोन िलगं असे विलोभनीय शिवशक्तीचे दर्शन या ठिकाणी पाहावयास मिळते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version