Home क्रीडा फिफा विश्वचषक: जर्मनी सलग चौथ्यादा उपांत्य फेरीत

फिफा विश्वचषक: जर्मनी सलग चौथ्यादा उपांत्य फेरीत

1

जेतेपदाच्या शर्यतीतील क्रमांक एकचे दावेदार आणि संपूर्ण स्पर्धेत प्रभावी खेळ करणा-या जर्मनीने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

रिओ दी जानेरो- संपूर्ण स्पर्धेत प्रभावी खेळ करणा-या जर्मनीने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने फ्रान्सवर १-० असा विजय मिळवला.

जर्मनीने सलग चौथ्यादा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. २००२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २००६ आणि २०१० मध्ये माजी विजेत्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. जर्मनीने १९५४, १९७४ आणि १९९० मध्ये वर्ल्डकप जेतेपद पटकावले आहे.

तर १९९८ मध्ये ‘चँपियन्स’ तसेच २००६ मध्ये उपविजेतेपद मिळवलेल्या फ्रान्सची गेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत कामगिरी उंचावली. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत फ्रान्सवर गटवार साखळीतच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली होती. यंदा अंतिम १६ संघांत स्थान पटकावले तरी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीसमोर त्यांचे काहीच चालले नाही.

सामन्यातील पहिल्या सत्रातील १२व्या मिनिटाला जर्मनीच्या मॅट्स हमेल्स याने हेडद्वारे गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४२व्या मिनिटाला फ्रान्सला बरोबरी साधण्याची संधी होती. पॅट्रिक इव्हराच्या अप्रतिम क्रॉसवर करिम बेन्झेमाचा ‘पॉवरफुल’ हेडर हॅमेल्सला लागून रोखला गेला. पहिल्या सत्राचा विचार करता उपयुक्त गोल करणा-या जर्मनीचे वर्चस्व राहिले. त्यांनी फ्रान्सच्या तुलनेत अधिक (म्हणजे ५५ टक्के) चेंडूवर ताबा ठेवला. जर्मनीच्या हमेल्सचा चेंडू अचूक जाळयात टाकता आला असला तरी गोलपोस्टच्या दिशेने (टार्गेट) फटके मारण्यात फ्रान्सने (पाच वेळा) आघाडी राखली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही.

दुस-या सत्रात फ्रान्सने चेंडू गोल जाळ्यात टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. ९० मिनिटानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त चार मिनिटामध्येही फ्रान्सने गोल करण्याचे प्रयत्न केले.

आता उपांत्य फेरीत जर्मनीची लढत ब्राझील आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघाशी आठ जुलै रोजी होईल.

असा झाला सामना-

९.३०- किक ऑफ

९.४२- जर्मनीच्या मॅट्स हमेल्स याचा १२व्या मिनिटाला गोल, जर्मनीकडे १-० अशी आघाडी

> ४२व्या मिनिटाला फ्रान्सला बरोबरी साधण्याची संधी होती. पॅट्रिक इव्हराच्या अप्रतिम क्रॉसवर करिम बेन्झेमाचा ‘पॉवरफुल’ हेडर हॅमेल्सला लागून रोखला गेला.

> पहिल्या सत्राचा खेळ संपला, जर्मनीकडे १-० अशी आघाडी

> पहिल्या सत्राचा विचार करता उपयुक्त गोल करणा-या जर्मनीचे वर्चस्व राहिले. त्यांनी फ्रान्सच्या तुलनेत अधिक (म्हणजे ५५ टक्के) चेंडूवर ताबा ठेवला. जर्मनीच्या हमेल्सचा चेंडू अचूक जाळयात टाकता आला असला तरी गोलपोस्टच्या दिशेने (टार्गेट) फटके मारण्यात फ्रान्सने (पाच वेळा) आघाडी राखली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही.

> जर्मनी सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत

> उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत फ्रान्सचा १-० असा केला पराभव

> उपांत्य फेरीत जर्मनीची लढत ब्राझील आणि कोलंबिया यांच्यातील विजय संघाशी होणार

1 COMMENT

  1. असा झाला सामना-

    ९.३०- किक ऑफ

    ९.४२- जर्मनीच्या मॅट्स हमेल्स याचा १२व्या मिनिटाला गोल, जर्मनीकडे १-० अशी आघाडी

    > ४२व्या मिनिटाला फ्रान्सला बरोबरी साधण्याची संधी होती. पॅट्रिक इव्हराच्या अप्रतिम क्रॉसवर करिम बेन्झेमाचा ‘पॉवरफुल’ हेडर हॅमेल्सला लागून रोखला गेला.

    > पहिल्या सत्राचा खेळ संपला, जर्मनीकडे १-० अशी आघाडी

    > पहिल्या सत्राचा विचार करता उपयुक्त गोल करणा-या जर्मनीचे वर्चस्व राहिले. त्यांनी फ्रान्सच्या तुलनेत अधिक (म्हणजे ५५ टक्के) चेंडूवर ताबा ठेवला. जर्मनीच्या हमेल्सचा चेंडू अचूक जाळयात टाकता आला असला तरी गोलपोस्टच्या दिशेने (टार्गेट) फटके मारण्यात फ्रान्सने (पाच वेळा) आघाडी राखली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version