Home देश मल्ल्याच्या ८ कारचा लिलाव होणार

मल्ल्याच्या ८ कारचा लिलाव होणार

0

देशातील बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या याच्या ८ आलिशान कारचा लिलाव येत्या २५ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई- देशातील बँकांना गंडा घालून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या याच्या ८ आलिशान कारचा लिलाव होणार आहे. अंधेरी येथील किंगफिशरच्या बॅकयार्डमध्ये सध्या या कार पडून आहेत. या कार्सचा लिलाव येत्या २५ ऑगस्टला केला जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मर्चंट बँकिंग शाखा एसबीआयकॅप ही लिलाव करणार असून त्याद्वारे १४ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मल्ल्याकडे देशातील १७ बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून मल्ल्याविरोधात बँका न्यायालयातही गेल्या आहेत. त्याच्या मालमत्तेचे लिलाव करून रक्कम वसूल करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. परंतु यापूर्वी दोन वेळा बँकांनी मल्ल्या याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही वेळा बोलीदार फिरकले नाहीत. एकदा बँकेला अपेक्षित रक्कम आली नाही.

लिलाव प्रक्रियेनुसार बोलीदारांना कारच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम भरावी लागेल. नोंदणीची अखेरची तारीख २३ ऑगस्ट आहे. नोंदणी शुल्क २००० रुपये आहे. २९ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत कार बोलीदारांसाठी ठेवल्या जातील. यापूर्वी किंगफिशर हाऊसचा लिलाव आयोजित केला होता. परंतु बोलीदारच मिळाले नाहीत. किमान किमत जास्त ठेवल्याने बोलीदार मिळाले नाहीत, असे सांगण्यात येते. मल्ल्याचे ८ जेट विमाने कर अधिका-यांनी जप्त केली. नंतर ती २२ लाखात भंगार विक्रेत्याला विकून टाकली. मल्ल्याला कर्जबुडव्या आणि फरार घोषित करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version