Home महाराष्ट्र मराठवाडयात सर्वत्र पावसाची हजेरी!

मराठवाडयात सर्वत्र पावसाची हजेरी!

0

मराठवाडयात गुरुवारी अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. 

नांदेड- मराठवाडयात गुरुवारी अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मराठवाडयाच्या आठही जिल्ह्यांत सरासरी १७.७६ मिमी पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३३.४२ मिमी पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी २ च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती.

मराठवाडयात सर्वत्र पाऊस होत असल्याने विष्णुपुरी बंधा-यात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बुधवारी बंधा-याचे दोन गेट उघडण्यात आले. एक गेट सकाळी बंद करण्यात आले तर एक गेट उघडे ठेवण्यात आले.

बंधा-यात ५०० दलघमी पाण्याची आवक सुरू असून तेवढेच पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. रहाटी, सोमेश्वर, जैतापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.

नाळेश्वर, रहाटी येथे नदीला पूर आल्याने काही काळ या गावाचा संपर्क तुटला. या गावाजवळ सायंकाळी गोविंद बाबाराव बोकारे याच्या शेतात लिंबाच्या झाडावर वीज पडून म्हैस दगावली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version