Home देश मोदी म्हणतात, ही तर सुरुवात

मोदी म्हणतात, ही तर सुरुवात

1

नोटाबदलाचा हा माझ्या सरकारचा अंतिम कार्यक्रम नसून ती काळ्या पैशाच्या विरोधातील प्रदीर्घ लढ्याची सुरुवात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली- नोटाबदलाचा हा माझ्या सरकारचा अंतिम कार्यक्रम नसून ती काळ्या पैशाच्या विरोधातील प्रदीर्घ लढ्याची सुरुवात आहे. या लढ्याचा फायदा गरीब व सर्वसामान्य माणसाला मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हिवाळी अधिवेशनात भाजपाच्या संसदीय मंडळाच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचारामुळे गरीब, कनिष्ठ मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसत आहे.

हा काळा पैसा सरकारचा मोठा शत्रू आहे. त्याचा नायनाट करून अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेंव्हा सुरवातीला स्वराज्याचं स्वप्न पाहिले तेव्हा ते अशक्य होते. परंतु मावळ्यांची साथ व महाराजांचा मुत्सद्दीपणा यामुळे ते शक्य झाले. तसेच आता मोदीजी तुम्ही जे सुराज्याचे स्वप्न पाहिलेत ते आता जरी मुश्किल वाटत असले तरी तुमचा मुत्सद्दीपणा व जनतेची साथ यामुळे ते नक्कीच पुर्णत्वास उतरेल अशी सर्वसामान्यांना आशा आहे. जय हिंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version