Home महामुंबई हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही

हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही

1

रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणा-या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अन्यथा पेट्रोल दिला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली.

मुंबई- रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणा-या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. अन्यथा पेट्रोल दिला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षा समितीने मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. दुचाकीवरील दोन्ही स्वारांनी हेल्मेट घातले नसेल, तर पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे.

हेल्मेट वापरण्यास दुचाकीस्वारांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारने हा नियम केला आहे. गेल्या महिन्यात तेलंगणातील अदिलाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचे आदेश जारी केले आहेत.

त्यामुळे, पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार आणि त्याचा सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट असेल, तरच त्याला पेट्रोल देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

1 COMMENT

  1. दिवाकर रावते साहेब ,मुंबईचे रस्ते अगोदर सुधारा आणि नंतर हेल्मेटची सक्ती करा .हेल्मेटधारी रस्त्यांच्या खड्यात पडून मेले आहेत ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version