Home टॉप स्टोरी दिल्लीत दुसरीतील विद्यार्थ्याची हत्या

दिल्लीत दुसरीतील विद्यार्थ्याची हत्या

1

दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये एका शाळेत दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली- दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये एका शाळेत दुसरीत शिकणा-या विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. स्कूल बस वाहकावर हत्येचा आरोप असून त्याला अटक करण्यात आली. हत्येच्या निषेधार्थ आणि शाळा व्यवस्थापनावर कारवाईच्या मागणीसाठी शेकडो संतप्त पालकांनी रास्ता रोको केला.

प्रद्युम्न ठाकूर असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो गुरग्राममध्ये रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता.

प्रद्युम्न ठाकूरचा मृतदेह शुक्रवारी शाळेच्या स्वच्छतागृहात आढळून आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर स्कुलबसच्या वाहकाला अटक करण्यात आली. मुलावर लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न हा वाहक करत असून प्रद्युम्नने त्याला विरोध केल्याने बस वाहकाने त्याची हत्या केल्याचे समोर आले.

पालकांना शाळेत प्रवेश दिला जात नाही मग हा बस वाहक शाळेत चाकू घेऊन गेला कसा? तसेच शाळेचे सीसीटिव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे ठाकूर यांच्या कुटुंबियांनी शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. प्रद्युम्न ठाकूरची आई ज्योतीने शाळा व्यवस्थापनाने चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या तपासावर विश्वास नसून हत्येचा तपास सीबीआयने करण्याची मागणी त्यांनी केली.

शाळा व्यवस्थापनावर कारवाईच्या मागणीसाठी शेकडो संतप्त पालकांनी शाळे़जवळील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

1 COMMENT

  1. Wake up call —
    New India — Sab ka saath Sab ka Vikas ?
    ———————————————-
    Govt go on talking high upon ” New India, Sab Ka Saath Sab ka Vkas
    Beti Bachao -Beti Padhao,Smart cities,Brain Gain”” But ground reality
    exposes , Govt merely talks high

    Please notice [1] Deaths of children in Govt run Hospitals in UP, Maharashtra
    [2] child molestation, Kidnapping incidents have become casual.Minor Girls
    are being raped [3] Death of innocent people due to pothole, Building collapse
    Rail accidents [4] women remains unsafe in India [5]Condition of Govt run
    Schools, Hospitals are in pathetic condition [5] Transit camps which are for
    Tenants rehabilitation are in extremely bad condition. Tenants are dumped

    Reason behind these serious lapses are No Regular supervision ,no accountability

    jagdip H Vishnav
    Mumbai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version