Home महामुंबई प्रियांकालाही पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

प्रियांकालाही पाकिस्तानी कलाकारांचा पुळका

1

आता बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रालाही पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे.

मुंबई- पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आलेली असतांना अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांची बाजू घेतली आहे. त्यात आता बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रालाही त्यांचा पुळका आला आहे.

‘भारत-पाकिस्तानातील ताणलेल्या संबंधांवरुन नेहमी कलाकारांवरच का निशाणा साधला जातो? असा सवाल प्रियांका चोप्राने उपस्थित करत पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवला आहे.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट निर्माता संघटनेने पाकिस्तानी अभिनेत्यांवर बंदी घातली.

‘मी देखील देशभक्त आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले सरकार जो काही निर्णय घेईल तो मला मान्य आहे. दोन्ही देशांतील तणावग्रस्त परिस्थितीवरुन नेहमी कलाकारांना निशाणा बनवणे योग्य नाही, असे मत मांडत तिने ‘अशा परिस्थितीसाठी उद्योजक, डॉक्टर्स आणि राजकारण्यांना का जबाबदार धरले जात नाही’, असा सवाल केला आहे.

दरम्यान, सलमान खान, करण जोहर, शाहरुख खान, ओम पुरी यांनी देखील पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली होती.

1 COMMENT

  1. ह्या बयेला पाकिस्तानात पाठवून द्या ! भरपूर ” शिणेमे” मिळतील ,तिला .तिकडे .लै फेमस होईल बया ,!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version