Home टॉप स्टोरी शोभा डेंच्या ट्विटवर सचिनचे चोख उत्तर

शोभा डेंच्या ट्विटवर सचिनचे चोख उत्तर

1

रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबद्दल वादग्रस्त ट्विट केलेल्या शोभा डे यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चोख उत्तर दिले आहे. 

नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबद्दल वादग्रस्त ट्विट केलेल्या शोभा डे यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चोख उत्तर दिले आहे. ‘ऑलिंपिकमध्ये खेळण ही सर्वात कठीण गोष्ट आहे, आपल्या देशाचे ऑलिंपिकमध्ये प्रतिनिधित्व करणे सोपे नाही,’ असे सचिनने सुनावले आहे.

ऑलिंपिक खेळाडूंबद्दल शोभा डे यांचे वादग्रस्त ट्विट

शोभा डे यांनी ट्विटरवरून ऑलिंपिक खेळाडूंबद्दल ‘भारतीय संघाचे केवळ एकच लक्ष्य आहे. रिओला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यावर आता सचिननेही चांगलेच सुनावले आहे.

‘ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी वर्षानुवर्ष हे खेळाडू सराव करत असतात. एक पदक मिळविणे फार कठीण असून ते मिळविण्यासाठी खेळाडू प्रयत्न करत असतात. जेव्हा थोडक्यात संधी चुकते आणि पराभव होतो तेव्हा त्यांना नक्कीच वाईट वाटते’ असे तो म्हणाला.

‘जेव्हा वेळ तुम्हाला साथ देत नाही, निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही तेव्हा खरी आपल्याला पाठिंब्याची गरज असते,’ असे त्याने म्हणटले आहे.

1 COMMENT

  1. या बाईला राज ठाकरेच उत्तर देऊ शकतात ..त्या बाई ची लायकीच नाही या देशात रहायची…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version